केंद्र सरकारने १४ वर्षे वयापुढील मुले आणि नागरिकांना लस देण्याचा टप्प्या टप्प्याने निर्णय घेतला होता. यामुळे कोरोनाची तिसरी लाट फार काळ तग धरू शकली नाही. आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत केंद्राने १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरु होणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना व ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ डोस देण्याची घोषणा सोमवारी केली. १६ मार्चपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु ही लाट सौम्य ठरली. यात मुलांची संख्या एक टक्क्यांहून कमी होती असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु भविष्यात अशा लाटा येतच राहणार आहेत. कानपूर आयआयटीमधील संशोधकांनी जून-जुलैमध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यामुळे लहान मुलांचे लसीकरण व ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ म्हणजे बूस्टर डोस महत्त्वाचा मानला जात आहे.
१२ ते १४ वर्षांमधील मुले उद्या १६ मार्चपासून कोविन प्लॅटफॉ़र्मवर कोरोना लसीसाठी बुकिंग करू शकणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. यासह, 60 वर्षांवरील सर्व लोकांना आता बूस्टर डोस मिळणार आहे.
१२ ते १४ वर्षांमधील मुलांना Corvbevax ची लस दिली जाणार आहे. CoWIN प्लॅटफॉर्मवर 15 ते 18 वयोगटातील मुलांची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झाली होती. मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले होते.
नोंदणी कशी कराल?
12 ते 14 वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्सचा डोस दिला जाईल.- मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह किंवा स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतात. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास मुले त्यांच्या विद्यार्थी ओळखपत्रासह स्वतःची नोंदणी करू शकतात.- कुटुंबातील चार सदस्य एका मोबाईल नंबरवर नोंदणी करू शकतात.