या छोट्या देशाने केले ५०% लसीकरण पूर्ण.

भूतान हा आनंदी लोक असणारा देश म्हणून आपण ओळखतो. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. करोना लसीकरणात विकसित देशांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याच वेळेस भारताशेजारी असलेल्या भूतानने मोठी कमाल केली आहे. भूतानने आपल्या देशातील निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. ही किमया काही दिवसातच साधली आहे. भूतानने केलेल्या या कामगिरीमुळे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.



कसा गाठला ५०% लसीकरणा चा टप्पा:

भूतानमधील लसीकरणात ‘स्वयंसेवक’ असलेल्या सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरली. या स्वयंसेवकांच्या मदतीने भूतानमधील दुर्गम भागातील आरोग्य केंद्रावर लसी पाठवण्यात आल्या. त्याशिवाय लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करणे, लशीचे महत्त्व समजवून देण्यासारखी कामेही या स्वयंसेवकांनी पार पाडली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सामाजिक अंतराबाबतही या स्वयंसेवकांनी लोकांना प्रशिक्षित केले.


भूतानमध्ये ३७ डॉक्टर आणि ३००० हजार पूर्णवेळ आरोग्य सेवक आहेत. त्यामुळे या स्वयंसेवकांच्या कामगिरीचे महत्त्व अधिक आहे. लष्कराच्या जवानांसाठी असणारे खास शूज या स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक दुर्गम ठिकाणी पोहचण्यास मदत झाली. त्याशिवाय प्रशासनाने हेलिकॉप्टरचीही व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली नसती तर गावांमध्ये लस पोहचवण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला असता.

भारताकडून लसीकरणाची मदत:

भारत आणि चीनच्या सीमेला लागून असलेल्या भूतानमध्ये मागील नऊ दिवसामध्ये आतापर्यंत चार लाख ६६ हजार ८११ जणांना लस दिली आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी ८५ टक्के जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के इतके आहे. करोना लसीचा दुसरा डोस आठ ते १२ आठवड्यानंतर देण्यात येणार आहे. त्यासाठी भूतान भारतावर अवलंबून आहे. येत्या महिनाभरात भारताकडून करोना लस उपलब्ध होण्याची आशा आहे. भूतानमध्ये २७ मार्चपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts