डोक्याला ताप “कोरोना ची कॉलर ट्यून”, आता बंद होणार ?

जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला कॉल करतो तेव्हा तेथून प्री-कॉल ऑडिओ ऐकू येतो. या ऑडिओमध्ये तुम्ही स्वतःला आणि इतरांना करोनापासून कसे वाचवू शकता हे सांगितले जाते. यामध्ये कोरोना संबंधित खबरदारीची माहिती देण्यात आली आहे. पण लोकांना विचाराल तर ते या गोष्टीला कंटाळले आहेत आणि प्रत्येक वेळी तेच ऐकतात असे सांगतात. अनेकांची अशी तक्रार होती की खुप गरजेचं सांगणं या गोष्टीमुळे विसरायला व्हायचं, अनेकांना तर या ट्यून ने पिसाळून सोडलं होत. आता सरकार लवकरच ही अडचण दूर करणार आहे. प्री-कॉल ऑडिओ लवकरच बंद होणार आहे.

टेलिफोन ऑपरेटर यांचे काय आहे म्हणणे ?

दूरसंचार विभागाने यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून करोनाशी संबंधित कॉलर ट्यून आणि प्री-कॉल ऑडिओ बंद करण्याची शिफारस केली आहे. हे बंद करण्याची मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मोबाईल ग्राहकांकडूनही करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. सूत्राने सांगितले की, साथीच्या आजाराची स्थिती सुधारत असताना आरोग्य मंत्रालय ही ऑडिओ क्लिप काढून टाकण्याचा विचार करत आहे. याशिवाय कोविडविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक मोहिमा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

ट्यून बंद करण्याला पैसा, ग्राहकांची तक्रार की आणखीन दुसरे कारण?

प्री-कॉल ऑडिओ कोरोना ट्यून, बँडविड्थ संसाधनांची किंमत देखील वाढवते. यामुळे टेलिकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर लोड वाढतो, ज्यामुळे ग्राहकांना फोन उचलायला विलंब होतो. तेथून आधी ऑडिओ वाजत असताना घाईघाईने फोन करावा लागत असल्याने यामुळे ग्राहकही नाराज झाले. याबाबत ग्राहकांनी मोबाईल सेवा पुरवठादारांकडे तक्रार केली आहे. या ऑडिओला रिंग बॅक टोन देखील म्हणतात. आरटीआयच्या माध्यमातून रिंग बॅक टोन्सविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकार याबाबतीत लवकरच निर्णय घेईल असे मत काही टेलिकॉम क्षेत्रातून तज्ञ मंडळी देत आहेत.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts