महाराष्ट्रात रात्री प्रवास करताय,ही घ्या काळजी.

मुंबई: रात्री 8 नंतर राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 8 नंतर बाहेर पडायचं असेल तर कोणत्या गोष्टी जवळ असाव्यात आणि कोणाला 8 नंतर बाहेर पडण्याची परवानगी आहे. राज्यात सरकारने नव्या निर्बंधांची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने आणखी कठोर निर्बंध जारी केले आहेत. ज्यामुळे आता कोणालाही घराबाहेर पडायचे असेल तर त्यांच्याकडे आवश्यक कारण असणं गरजेचं आहे. कोणत्याही कारणा शिवाय रात्री 8 नंतर बाहेर फिरणं महागात पडू शकतं.

ह्या कागद पात्रांची घ्या यादी जी तुम्हाला पडेल उपयोगी:


-ज्यांच्या परीक्षा आहेत अशा विद्यार्थ्यांना रात्री 8 नंतर घरी प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे हॉल तिकीट असावं.
– ज्या व्यक्तींना रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे किंवा बस किंवा विमानातून प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे अधिकृत तिकिट असणं आवश्यक असणार आहे.
– औद्योगिक क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात त्यांच्याकडे ओळखपत्र हवं आहे.
– विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळावे लागतील. लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी असणार आहे.
– घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्याबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेणार आहे.
– शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी नियम आणि अटीनुसार देण्यात येईल.

काळजी घ्या आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा, वेळोवेळी हात धुवा आणि आता मास्क आपल्या जीवनावश्यक वस्तू आहे ही गाठ मनाशी पक्के बांधा. अश्याच बातम्यांसाठी मराठीShout ला भेट देत रहा.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts