या शहरातील ग्राहकांना 5G चा लाभ लवकरच मिळेल. लगेच जाणून घ्या.

सध्या 5G सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि ती म्हणजे, आता भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह 8 शहरांमध्ये त्यांची सेवा सुरु केली आहे. अशा स्थितीत ग्राहकांना अनेक प्रश्न भेडसावतायत. जुन्या स्मार्टफोनमध्ये 5G चालेल का ? विशेषत: अशा लोकांच्या फोनमध्ये ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहेत. तसेच, सध्या अनेक ग्राहकांच्या 5G स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क येत नाही.

 

जुन्या स्मार्टफोन्सचे काय होईल ?

 

तुमच्याकडे 4G फोन असल्यास, 5G सेवा सुरू केल्याने ते निरुपयोगी ठरणार नाहीत. उलट 5G नेटवर्क आल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन वापरण्यास सक्षम असाल. विशेष म्हणजे तुम्हाला यावर 5G स्पीड मिळणार नाही, परंतु तुम्ही चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊ शकाल.

 

5G सेवा कधी मिळणार?

 

भारतात 5G सेवा आतापर्यंत फक्त 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. तीही पूर्णपणे सुरु झाली नाही आहे.त्याऐवजी, वापरकर्त्यांना फक्त काही भागांमध्ये 5G नेटवर्क मिळत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या त्याचा झपाट्याने विस्तार करत आहेत.

 

टेलिकॉम कंपन्यांच म्हणण काय ?

 

देशभरात 5G सेवा सुरू होण्यासाठी मार्च 2024 पर्यंत वेळ लागणार आहे. जिओने (Jio) एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या अखेरीस त्यांची 5G सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. तसेच जिओने 1000 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. त्याचवेळी, एअरटेलचे (Airtel) म्हणणे आहे की, त्यांची 5G सेवा मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होईल. दरम्यान जर तुम्ही सणासुदीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नक्की 5G स्मार्टफोन खरेदी करा. जेणेकरून तूम्हाला 5G सेवेचा लाभ घेता येईल. 

 

आता हे शक्य होणार

 

–  नेटवर्क स्ट्राँग नसल्यामुळे कॉल ड्रॉप ही एकच समस्या होती. यासोबतच क्लिअर ऑडिओ नसल्यामुळे कॉलिंग डिस्टर्ब होते. 5G सेवा आल्यानंतर तुम्हाला कॉलिंग दरम्यान पुढील स्तराचा अनुभव मिळेल आणि हे क्रिस्टल क्लिअर ऑडिओसह शक्य होईल.

 

– अर्थातच हाय स्पीड इंटरनेटसोबतच आता युजर्सला 5G सेवा लाँच झाल्यानंतर सुपर फास्ट डाउनलोडिंग स्पीड बघायला मिळणार आहे जी जुन्या सेवेपेक्षा खूप चांगली असेल आणि तुमचा बराच वेळ वाचवेल. दर्जेदार चित्रपट आणि व्हिडीओज आता फास्ट डाउनलोड होणार आहेत.

 

एकंदरीत 5G मुळे आता सगळ्या फास्टर तो फास्टेसट सेवा पुरवण्यात येतील. ते ही झटपट त्यामुळे आता ग्राहकांच्या तक्रारीं कुठेतरी कमी होतील हे नक्की.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts