आता पत्नी ला द्यावी लागेल पतीला पोटगी ?

 

पायरेक्ट ऑफ करेबियन (pirates of the Caribbean) या सिनेमासाठी जॉनी डेप हा ओळखला जातो. जॉनीला तीन वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळालंय. तर प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्काराचाही तो मानकरी ठरला होता. गेल्या काही दिवसांपासून जॉनी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या खटल्याची तुफान चर्चा रंगली होती. अखेर हा खटला जॉनीने जिंकलाय. त्यामुळे जॉनीची पूर्व पत्नी असलेल्या एंबर हर्डला कोर्टानं दणका दिलाय. जॉनी डेपने एंबर हर्ड या आपल्या पूर्व पत्नीविरोधात दाखल केलेला मानहानी खटला अखेर जिंकल्यानं त्याला आता तब्बल ११६ कोटी ३३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. जॉनी डेपने खरंतर आधी ५० मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. पण अखेर १५ मिलियन डॉलर्स इतकी नुकसान भरपाई देण्याचे आदेश जीनी डेपची पत्नी एंबर हर्ड (Amber Heard) हिला देण्यात आले आहेत.

लग्नानंतर १५ महिन्यात घटस्फोट

२०११ साली जॉनी आणि एंबर एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. द रम डायरी सिनेमाच्या सेटवर त्यांनी ओळख झाली. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी ते सिनेमाच्या प्रमोशनसाठी भेटले. यानंतर ते एकमेकांना डेट करुन लागले होते. २०१५ साली त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. पण १५ महिन्यांच्या संसारानंतर त्यांनी काडीमोड घेतला.

हे सगळं प्रकरण २०१८ सालापासून सुरु झालं होतं. एका दैनिकात भलामोठा लेख लिहून एंबरने आपल्या मनातली खदखद मांडली होती. कौंटुबीक हिंसाचाराचे बळी असल्याचा आरोप एंबरने केला होता.

याआधी २०१६ साळी एंबर हर्डने जॉनीवर मारहाणीचा आरोपही केलेला होता. लेखात करण्यात आलेले सनसनाटी आरोप जॉनीला सहन झाले नाहीत आणि झालेल्या अपमानाविरोधात त्यानं न्यायालयात पत्नीविरोधात खटला दाखल केला होता. पत्नीविरोधात जॉनीने खटला दाखळ केल्यानंतर पत्नी एंबरनेही जॉनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला बोता. जॉनीने ५० मिलियन तर एंबरने १०० मिनियन डॉलरचा खटला दाखल केलेला.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts