झी मराठी वरील थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ ही लवकरच परतणार आहे . देवमाणूसचा पहिल्या भागाने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण या मालिकेचा दुसरा भाग येणार आहे.मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे हिने याबाबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. देवमाणूस भाग -2 ची झलक या पोस्ट मध्ये आहे.
पहिल्या भागात देवमाणूस डॉक्टरचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला दाखविण्यात आला नव्हता त्यामुळे प्रेक्षक गोंधडात होते कारण भाग एक चा शेवट हा अर्धवट दाखविण्यात आला होता त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती, तेव्हापासूनच या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि तसे संकेतही निर्माती श्वेता शिंदे हिने दिले होते.
देवमाणूस भाग -1 मध्ये एकूण ३०० एपिसोड दाखवण्यात आले होते यात पैसे आणि दागिन्यांसाठी डॉक्टर एकामागून एक खून करतो. पोलिस त्याला अटकही करता पण त्याच्यावरील गुन्हे मात्र कोर्टमध्ये सिद्ध होत नाहीत आणि त्यामुळे त्याची सुटका होते. ही लोकप्रिय मालिका सर्वांधिक चर्चेत आली होती. अभिनेता किरण गायकवाड याची देवमाणूस मालिकेत मुख्य भूमिका आहे यामध्ये त्याने दमदार अभिनय केला आहे.
देवमाणूस सत्य घटनांवर आधारित आहे का ? Devmanus Real Story
मालिकेत दाखविण्यात आलेल्या डॉक्टर अजितकुमार देव हे सत्य घटनावर आधारित आहे ही घटना साताऱ्यातील डॉक्टर ची आहे जो अनेक लोकांना फसवतो व त्यांचा खून करतो.
आता या मालिकेचा दुसऱ्या भाग (Devmanus 2) लवकरच येत आहे याची सूचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून या दुसऱ्या भागाची झलक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दाखविण्यात आली त्यात जुना वाडा, डॉ. अजित देव चा फलक दिसतो.
देवमाणूसच्या या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून मालिकेचा शेवट जरा नीट दाखवा असे कमेंट निर्माती श्वेता शिंदे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टव प्रेक्षकांनी केल्या आहे.