दिवाळीचा फराळ करताय ? मग या सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा. सगळेच पदार्थ अगदी चविष्ट होतील.

दिवाळी जवळ येत आहे, भरपुर फराळही बनवायचा आहे. परंतु दरवर्षी आपण फराळ करताना आपल्याकडून काही ना काही चूक होतच असते. किंवा कधी फराळाची चव बिघडते. या आपल्या छोट्याश्या चुकीमुळे अख्खा फराळ लवकर संपत नाही. किंवा अनेकांना आवडत देखील नाही. यंदाच्या दिवाळीचा फराळ चविष्ट, रुचकर व्हावा याकरिता खास तुमच्यासाठी सध्या सोप्या टिप्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. मग चला तर यंदाचा तुमचा फराळ जरा हटके, झटपट करण्यासाठीं काही सोप्या टीप्स लगेच बघुयात. 

 

वेगळ्या पद्धतीने बनवा चिवडा.

 

यातील पहिली गोष्ट म्हणजे चिवडा. 

चिवडा बनवताना आपण जेव्हा मीठ आणि साखर वरून टाकत असतो तेव्हा मीठ आणि साखर चीवड्याच्या तळाशी गेलेली असते. आणि जेव्हा चिवडा संपतो तेव्हा ही बाब अनेकांच्या लक्षात येत असते. जर आपण वेगळ्या पद्धतीने चिवडा केला तर मीठ आणि साखर आणि बाकी काही मसाले हे चिवड्याच्या शेवटी तळाला जाणार नाही किंवा ते वाया सुद्धा जाणार नाही यासाठी एक सोपी टीप म्हणजे चिवडा करताना साखर आणि मीठ हे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे आणि त्यानंतर चिवडा करताना ते वरुन टाकावे आणि अलगद हाताने एकजीव मिक्स करून घ्यावे असे केल्यास चिवड्याच्या तळाशी साखर किंवा मीठ किंवा इतर मसाल्यांची मिश्रण सुद्धा राहणार नाही आणि मसाले, मीठ, साखर हे प्रत्येक पोह्यांना चिकटतील. यासोबतच चिवड्यातील दुसरी टीप म्हणजे आपण चिवडा बनवताना अनेकदा पोहे तुटत असतात त्यामुळे पोह्यांचा चुरा होतो ते अनेकांना आवडत नाही आणि खायला सुद्धा आकर्षक वाटत नाही. असे होऊ नये म्हणुन आधी तुम्ही चिवड्याची फोडणी द्या त्यानंतर फोडणीमध्ये, पोहे न भाजता पोहे त्या फोडणीत टाका त्यानंतर एक जीव, समरस होईल असं मिश्रण चांगलं मिक्स करा त्यानंतर तुमचे पोहे देखील तुटणार नाही आणि चिवडा दिसण्यास सुद्धा आकर्षक वाटेल.

 

लाडू बनवताना हे करा.

 

यातील दुसरी टीप आहे आपल्याला बेसन लाडू सगळ्यांनाच आवडत असतात परंतु बेसन लाडू बनवताना जर तुम्ही ही सोपी टीप वापरली तर अतिशय उत्तम पद्धतीने आणि तुपाचा किंवा तेलाचा अपव्यय न करता लाडू अगदी चविष्ट होतील. आता ही टीप अशी, की लाडू करताना आपण जेव्हा बेसन दळून आणतो, ते बेसन दळून आणण्याच्या आधी चणाडाळ ही मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिटे चांगले भाजून घ्यावी याने काय होईल तर बेसन लाडू करताना बेसन आपण जेव्हा तुपात भाजतो तेव्हा तूप हे कमी प्रमाणात लागेल आणि लाडू ही अगदी चविष्ट होतील. तर ही टीप लक्षात घेऊन तुम्ही नक्कीच करून पहा.

 

शंकरपाळे बनवताना…

 

तिसरी गोष्ट म्हणजे शंकरपाळी करताना आपण नेहमीच चौकोन आकाराच्या शंकरपाळ्या करत असतो पण यंदाच्या दिवाळीत चौकोन आकाराच्या शंकरपाळ्या न कापता आपण चंद्राच्या आकाराच्या शंकरपाळ्या केल्या तर त्या अधिक आकर्षक दिसतील आणि लहान मुलांना सुद्धा ते नक्कीच आवडतील तर यंदाच्या दिवाळीत तुम्ही औषधीच्या झाकणाचा  वापर करा. अहो म्हणजेच, औषधीचे झाकण घेऊन त्याला आधी स्वच्छ धुऊन घ्या आणि एक पारी लाटून त्या झाकणाने चंद्राच्या आकाराचे काप तयार करा व ते तळून घ्या. त्यानंतर एक आकर्षक असा आकार तयार होईल लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा खाण्यास आवडेल तर यंदाच्या दिवाळीत ही टीप नक्कीच ट्राय करा.

 

रवा लाडू बनवताना..

 

रवा लाडू हा बहुतांश लोकांना बहुतांश खवय्यांना फारच आवडतो अनेक गृहिणी रवा लाडू करताना त्यात सुख खोबरं अवश्य घालतात परंतु जर तुमच्या घरी सुख खोबरं असेल आणि तेच तुम्हाला रव्याचे लाडू मध्ये टाकायचं असेल तर अशावेळी ते सुख खोबरं सुक्या खोबऱ्याच्वरचे काळे भाग अलगदपणे सुरूने किंवा किसणीने काढून घ्या आणि त्यानंतर संपुर्ण खोब्रं किसणीने  किसून घ्यायचा आहे त्यानंतरच त्या पांढरा खोबरा किस रव्याच्या लाडूमध्ये टाकायचा आहे. रव्याचे लाडू हा अगदी चविष्ट आणि पांढरे शुभ्र होतील सोबतच तुमच्या घरी असलेल्या सुक्या खोबऱ्याचा चांगला देखील उपयोग होईल.

 

कुरकुरीत शेव कशी बनवाल ?

 

दिवाळीत बेसन शेव करायची म्हटलं तर बेसनात पाणी घालतांना गुठळ्या होतात. आणि ह्या अनेक गृहिणींच्या तक्रारी आहेत तर यंदाच्या दिवाळीत जर गुठळी न होता बेसन शेव करायची असेल आणि तेही कुरकुरीत तर ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा ते म्हणजे बेसन शेव करताना बेसन आधी चाळून घ्यायचा आहे पूर्णपणे बेसन चाळून घेतल्यानंतरच तुम्ही बेसनामध्ये पाणी घालून मीठ घालून थोडीशी हळद, ओवा, तुपाचे मोहन घालून नंतर शेव तेलात पिळू शकता.

 

पदार्थ कसे ठेवाल ?

 

यानंतरची टीप म्हणजेच दिवाळीमध्ये आपण जेवढा फराळ करतो तो फराळ काही दिवसांनी नरम पडतो किंवा काही दिवसांनी त्याच्यावर बुरशी लागते. त्यासाठी सोपी टीप म्हणजे चिवडा, लाडू, शेव, चकली, शंकरपाळे किंवा अनारसे आणि इतर काही पदार्थ जर नरम पडत असतील तर ते पदार्थ आधी थंड होऊ द्या. बनवल्यावर लगेच ते गरमागरम पदार्थ डब्यामध्ये भरून ठेवू नका. पदार्थ थंड झाले की डब्याच्या वरती झाकणाला एका टिशू पेपरने हवाबंद स्वरूपात पॅक करा किंवा अगदीच थोडेसे पदार्थ बनवले असतील तर ते थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही रॅप करून किंवा पिन लावून डबा बंद करून ठेवू शकता कसे केल्यास हे पदार्थ काही दिवस आणखीन टिकतील.

 

ही चूक करू नका..

 

गोड पदार्थ हा अनेकांचा आवडीचा पदार्थ असतो गोड पदार्थ म्हटल्यानंतर गृहिणी अनेकदा जायफळ, वेलदोड्याची पूड टाकतात परंतु अनेक गृहिणी ह्या खाली वेळेत वेलची पूड आधीच करून ठेवत असतात परंतु असे करू नये जर वेलची पूड तुम्ही आधीच बारीक करून ठेवत असाल तर त्याचा सुगंध हा लगेच चालला जातो. गोड पदार्थांमध्ये आपण वेलचीपूड किंवा जायफळ यासाठी टाकतो कारण त्याचा सुगंध यावा म्हणून. परंतु जर ते आधीच जायफळ किंवा वेलची पूड करून ठेवली तर त्याचा सुगंध हा चालला जातो म्हणून गोड पदार्थ करताना त्वरितच जायफळ किंवा वेलची पूड बारीक करून टाकावी गृहिणींनी ही पूड आधीच करून ठेवू नये.

 

चकली अशी बनवा.

 

चकली करताना आपण वेगवेगळे जिन्नस एकत्र करून त्याचे मिश्रण तयार करत असतो परंतु चकलीचे पीठ भिजवताना तुम्ही हिरव्या मिरच्या, कोथिंबीर तसेच लसणाच्या काळ्या घालून ही पेस्ट जर चकलीच्या मिश्रणात एक जीव मळवली तर चकलीची चव अगदी सुरेख आणि चविष्ट होते तर ही टीप तुम्ही हे नक्की ट्राय करा यंदाच्या दिवाळीत चकलीचे मिश्रण भिजवताना लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट बनवून नक्की टाकून बघा.

 

करंजी तळताना फुटते ?

 

आणि गृहिणींच्या अनेक पदार्थांवरून तक्रारी असतात, गोड पदार्थांमधील अतिशय लोकप्रिय पदार्थ म्हणजे करंजी. करंजीचे सारण प्रत्येक गृहिणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात. कोणाला रव्याचे सारण आवडते तर कोणाला खोबऱ्याचे सारण आवडते तर कोणी त्यात ड्रायफ्रूट्सचे सारण टाकत असतात. परंतु करंजी जेव्हा आपण तळतो तेव्हा अनेक करंज्या ह्या तेलामध्येच फुटत असतात आणि त्यातील सारण तेलामध्ये बाहेर पडत असते त्यामुळे तेलही खराब होतो आणि करंज्या तळताना असा प्रोब्लेम झाला तर गृहिणीचा मूड देखील खराब होतो तर अशा वेळेस तुम्ही करंजीच्या तळताना करंजी मधील सारण बाहेर जाऊ नये म्हणून पारी लाटताना सारण भरताना पारीला गोलाकार हात फरवून मग दाबून बंद करावे. महत्वाचे म्हणजे करंजीचे सारण हे कमीही नाही आणि जास्तही नाही म्हणजेच अगदी मध्यम आकारात सारण भरून त्याला आतून पाण्याचा हात लाऊन पॅक करून घ्यावे मग बघा तुमची आवडती करंजी कधीही तेलात फुटणार नाही. किंवा सारणही बाहेर पडणार नाही.

 

अनारसे बनवतांना तुटतात ?

 

गोडाचा एक लोकप्रिय आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे अनारसा. अनारश्याचे सारण जर बरोबर जमले नाही तर अनारसा हा फुटतो किंवा तळताना तो तुटतो, तर अनार्श्याचे पीठ मळवताना तुपाचा हात लावून एकजीव मळवून घ्यावा. अनारशाची कणिक चांगली मळून घ्यावी आणि एक पारदर्शक प्लास्टिक स्वच्छ धुऊन त्याला मधून तुपाचा हात लावून सारणाचा बारीक गोळा घ्यावा आणि त्याला भोवताल प्रेस करा. छोटे किंवा मध्यम आकाराचे अनारसे बनवून थोडी जाडी ठेवा. त्यावर तुम्ही खसखस वरून टाकू शकता आणि मध्यम आचेवर तेलात तळून घेऊ शकता बघा तुमचे अनारसे अगदी सुरेख आणि चविष्ट होतील आणि ते तेलात फुटणार आहे नाही आणि तुटणारही नाहीत.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts