कुंडलीत सगळ्यात मोठा दोष जो मानला जातो तो म्हणजे पितृदोष. जर कुणाला पितृदोष असेल तर घरात मांगलिक कार्ये होत नाही. चांगल्या कामात वारंवार अडचणी निर्माण होतात. उपवर वधुंच्या विवाहात अडचणी येतात. कित्येक प्रयत्न करून सुध्दा यश मिळत नाही. वारंवार जेवणात केस निघणे इतर आणि अनेक अश्या गोष्टी पितृदोष असण्याची कारणे सांगतात. परंतू पितृदोष असल्यावर जर आपण नियमांचे उल्लंघन केले तर त्याचा अधिक प्रतिकूल प्रभाव आपल्या जीवनावर पडेल हे मात्र नक्की. त्यामुळे ज्यांना पितृदोष आहे त्यांनी या काळात काय करावे आणि काय करू नये हे जर लक्ष्यात घेतले तर नक्कीच पितृदोष प्रभाव कमी करता येऊ शकतो. खरंतर हिंदू पंचागानुसार, यावर्षी १० सप्टेंबर २०२२ पासून पितृपक्ष सुरू होत आहे. २५ सप्टेंबर २०२२ रोजी पितृ पक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होईल. या दरम्यान पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंड दान केले जाते. पितृ पक्षात पितरांना जल अर्पण करणे विशेष मानले जाते, यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे. तर सर्वप्रथम जाणून घेऊयात काही अध्यात्मिक कर्मकांड आणि नियम.
पितृपक्षात हे करू नका –
१) संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये.
२) यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत.
३) कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये.
४) नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र, त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता.
५) घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये.
६) फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे.
७) घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये, याची काळजी घ्यावी.
८) कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा.
९) आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये.
१०) तुम्ही स्वत: श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील, तरी वरील सर्व नियम पाळावेत.
पितृपक्षाच्या हे आवर्जून करा –
१) श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. यात जल, काळे तीळ, कुश, गायीच्या कच्या दुधाचा, सुगंधित पुष्पाचा वापर करावा.
२) पितृ-श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार, ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. त्यादिवशी आपल्या पितरांचे आदरपूर्वक स्मरण करावे.
३) पितरांची पुजा करतांना संपुर्ण जेवणासकट गोड खिरीचा नैवेद्य जरूर दाखवावा. आणि दक्षिण दिशेला तीन दिवे लावून पितरांना नमन करावे.
४) दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शनघेत असाल तर त्याचेही पालन करावे.
५) ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे.
६) सात्विक भोजन करावे. लसून, कांदा यांचा वापर अजिबात करू नये.
७) संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरूजनांची पूजा करावी.
८) दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी.
९) मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत.
१०) घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात.
११) घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी, भाकरी जरूर द्यावी.
१२) पितृपक्षात ब्राम्हणांना जेवणास आमंत्रित करावे त्यांची सेवा करावी. ब्राम्हणांना वस्त्रदान, अन्नदान अवश्य करावे. हे काही उपाय केल्यास नक्कीच पितृदोष प्रभाव कमी होण्यास मदत होते.