हिवाळ म्हटलं आजार हे येणारच. की सर्दी, पडसे, खोकला किंवा कधी कधी तर अगदी शरीर थंड पडून जातो मग अशा वेळेस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही काम करत नाही बहुदा लोक हिवाळ्यात येणारे फळे आवर्जून खात नाहीत तर काही लोक हिवाळ्यातील फळे खाताना, आस्वाद घेताना दिसतात परंतु जर हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर हिवाळ्यात निघणाऱ्या फळांचा आस्वाद हा घेतलाच पाहिजे, कारण प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळं शरीरास महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन प्रदान करत असतात. त्यामुळे जर आपण हिवाळ्यात कोणती फळे खावीत हे जर आपल्याला माहिती असेल तर नक्कीच या आजच्या लेखाचा फायदा तुम्हाला होईल. मग चला तर बघूया आपल्याला तंदुरुस्त, सुदृढ आणि त्वचेला सौंदर्य प्राप्त करणाऱ्या या चमत्कारी फळांची माहिती.
संत्री
रस आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारात संत्री हे द्रव, जीवनसत्त्वे समृद्ध असलेले फळ आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी करतात.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हिवाळ्याच्या शेवटी दिसू लागतात कारण ते सर्वात थंडीच्या महिन्यांत जास्त पिकतात. सामान्यत: त्याची कापणी वसंत ऋतूच्या आगमनाच्या चिन्हांकित करते. हिवाळ्यात ही स्टोबेरी खाणं म्हणजे शरीरासाठी वरदानच ठरेल.
पिवळी फळे
खरंतर पिवळ्या फळांमध्ये विटामिन सी असते आणि विटामिन सी हे उन्हाळ्यामध्ये शरीरास उपयुक्त ठरते विटामिन सी ज्या फळांमध्ये असते ते फळ खाल्ल्यानंतर शरीरास एक वेगळ्या प्रकारचे रोगप्रतिकारक शक्ती उत्पन्न होते आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला सर्दी, पडसे होते त्यावेळेस ही रोगप्रतिकारशक्ती काम येते त्यामुळे हिवाळ्यामध्ये नक्की ही पिवळी फळ आवर्जून खावीत.
सीताफळ
अनेकांना सीताफळ हे त्यातील असलेल्या बियांमुळे आवडत नाही. मात्र याचे फायदे तुम्ही लक्षात घेतल्यास नियमितपणे तुम्ही हे फळ नक्की खाल. वजन वाढविण्यासाठी सीताफळ उपयुक्त असते. त्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे आणि जीवनसत्वांमुळे वजन वाढविण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते.
आवळा
थंडीच्या दिवसात बाजारात आवळा उपलब्ध होतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास आवळा उपयोगी ठरतो. आवळ्याने आम्लपित्त आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. केसांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठीही आवळा फायद्याचा असतो. थंडीच्या दिवसात त्यामुळे नियमितपणे आवळ्याचे सेवन केले पाहिजे. सोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आवळा उपयुक्त ठरतो.
पेरू
पेरूचा हंगाम हिवाळ्यात येतो. थंडीमुळे अनेकजण पेरू खात नसले तरी. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. दिवसा किंवा कोवळ्या उन्हात पेरू खाऊ शकता. म्हणजे व्हिटॅमिन डी आणि सी दोन्ही शरीरास मिळतील.
अशाप्रकारे तुम्ही हिवाळ्यात वरील फळे खाऊन स्वतःला तंदुरुस्त आणि अगदी हिट आणि फिट शरीरास ठेवू शकता.