जगप्रसिद्ध इलेकट्रीकल कार बनवणारी कंपनी टेस्ला व रॉकेट बनवणारी स्पेसेक्स चे सीईओ एलोन मस्क यांना श्रीमंत व्यक्तीच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचे स्थान गमवावे लागले त्यासाठी त्याचें एक ट्विट कारण ठरले. या ट्विटमुळे त्यानां जवळपास १५. २ बिलियन डॉलर गमवावे लागले. यामुळे श्रीमंत व्यक्तीच्या यादीतील प्रथम क्रंमाकाचे स्थान गमवावे लागले .
एलॉन मस्क चे ट्विट
काही दिवसपूर्वींच एलॉन मास्क यांनी ट्विटर द्वारे कळवले होते कि टेसला कंपनीने १. ५ बिलियन डॉलर बिटकॉइन (Dogecoin Cryptocurrency )मध्ये गुंतवले. त्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत खूप वाढ होऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र आता बिटकॉइनच्या किमतीत घट झाल्याने त्यांना मोठे नुकसान सोसवे लागले आहे . दरम्यान , बिटकॉइन आणि इथरच्या किमती जास्त आहे असा ट्विट तत्यांनी केला होता त्यानंतरच बिटकॉइन च्या किंमतीत घट होताना दिसली. त्यामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये ८. ५ टक्य्यांनी मोठी घट झाली व एलोन मस्क यांच्या संपत्तींत १५ बिलियन डॉलरपेक्षा अधिक घट झाली आहे.
Amazon चे मालक पुन्हा प्रथम स्थानी
एलॉन मस्क च्य संपत्तींत घट झाल्यावर मस्क १८३. ४ बिलियन डॉलर संपत्तींसह जागती ५०० सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आले तर Amazon ईकॉमर्स कंपनी चे मालक जेफ बेजोस हे परत एकदा अव्व्ल क्रमांकावर विराजमान झाले.