जगभरातील पेट्रोल चे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. श्रीलंकेला पेट्रोल पुरवणारा देश भारत असून लंकेतील भाव वाढले मग आता भारतात पण भाव वाढतील का असा प्रश्न सामान्यांना भेडसावत आहे.पेट्रोल चे भाव वाढण्याचे त्यांचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन चे युद्ध आहे.
पेट्रोल, डिझेल च्या किमती आणि त्यांचे नियंत्रण-
पेट्रोल आणि डिझेल चे साठे काही मोजक्याच देशाकडे उपलब्ध आहेत.आणि त्यांची मागणी सुद्धा दिवसे दिवस वाढत चालली आहे. मग एखादा देश ज्या देशाकडे जास्त पेट्रोल चे साठे आहेत. तो देश पेट्रोल चे उत्पादन करून ते कमी किमतीत विकू शकेल. मात्र त्या देशाला असे करता येत नाही कारण पेट्रोल उत्पादन करणाऱ्या देशाची संघटना आहे. तिचे नाव opec म्हणजेज ऑर्गनायझेसन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टइंग कोन्ट्रीज असून यावर ती नियंत्रण करते
का वाढल्या किमती-
सध्या चालू असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध याला जबाबदार आहे. पेट्रोल उत्पादन करणाऱ्या देशामध्ये रशिया अग्रस्थानी आहे. युक्रेन वर रशियाने केलेल्या आक्रमाना मुळे अमेरिका,यूरोपीय देशांनी रशिया वर कठोर प्रतिबंध लावले आहेत. ज्या मुळे रशिया आपले उत्पादित पेट्रोल आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट विकू शकत नाही. त्यामुळे रशिया चे पेट्रोल आंतरराष्ट्रीय बाजारात येणार नाही. साहजिकच मागणी जास्त आणि उत्पादन कमी यामुळे पेट्रोल ची किंमत वाढेल.
भारततील परिस्थिती-
5 राज्यातील निवडणूक झाल्यावर भारतात सुद्धा 15 ते 20 रुपयाची प्रति लिटर मागे वाढ होईल असा अंदाज लावण्यात येतो मात्र अजून पर्यंत याची शक्यता कमी आहे. या उलट प्रति लिटर मागे भारतात 1 रुपया काही शहरात कमी करण्यात आला आहे. रशिया आणि भारताची मैत्री मुळे मात्र रशिया ने आपले पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादन 25 %सवलत राखून देऊ असे म्हंटले आहे. पण अंतरराष्ट्रीय निर्बंध आणि OPEC चा दबाव राखून भारत पेट्रोल खरेदी करेल यावर शंकाच आहे. जर असे झाले तर पेट्रोल चे भाव भारतात आणखी कमी होतील.
श्रीलंकेतील परिस्थिती-
श्रीलंका हा देश चीनच्या आर्थिक बोजा खाली दबलेला असून खूप मोठे कर्ज त्या देशावर आहे. डॉलर चा साठा सुद्धा या देशाकडे कमी आहे. त्यामुळे साहजिकच आतंरराष्ट्रीय वस्तू ज्या श्रीलंकेत उत्पादित होत नाहीत त्याची किंमत श्रीलंकेतील चलना पेक्षा खूप जास्त असणार. या कारण मुळे तिथलं किंमतीत वाढ झाली आहे.