अभिनेत्री Evelyn Sharma लवकरच होणार “आई ” , प्रसुतीपुर्वी केलं होणाऱ्या मुलीबद्दल वक्तव्य.

Image source: /laughingcolors.com

अभिनेत्री Evelyn Sharma ही  लवकरच आई होणार आहे. Evelyn Sharma ही गरोदर असून तिला मुलगी होणार आहे अशे तिने  सांगितले व होणाऱ्या बाळाबद्दल खूप उत्सुक आहे असे म्हटलें

एव्हलिनने  15 मे रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये डेंटल सर्जन तुषान भिंडीसोबत गुपचूप लग्न केलं. कोविड-19 महामारीमुळे एल्विन आणि तुषान यांनी सध्या पध्दतीने लग्न केलं. 

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री एव्हलिनला प्रसिद्धी मिळाली. एव्हलिनने आधी तिचा फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीची माहिती सोशल मीडियावर सगळयांना दिली होती. आता Evelyn Sharma ने बेबी बंपचे फोटो शेअर केले असून मुलगी होणार असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. 

 

एव्हलिन शर्माने ( Evelyn Sharma ) ने अलीकडे एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की,  “आम्ही खूप उत्साही आहोत आणि आमच्या लहान बाळाला आमच्या हातात घेण्याची आतुरतेने खूप वाट पाहत आहोत. ही मुलगी आहे आणि आम्ही तिच्यासाठी  खूप उत्साहित आहोत.”

“आम्ही आमच्या लहान राजकुमारीसाठी एक आरामदायक नर्सरीसुद्धा सेट केली असून मात्र, मला माहीत आहे की  काही महिने ती आमच्यासोबत आमच्या बेडवर झोपनार. कुटुंब आणि मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छा व भेटवस्तूंबद्दल आम्ही खूप आभारी आहोत…” 

एव्हलिन शर्माने जुलैमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती तसेच तिने इन्स्टाग्रामवर स्विमसूटमधील तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये तिचा उत्साह व्यक्त केला होता. 

 

एव्हलिन शर्मा गेल्या 9 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे . एव्हलिनने मैं तेरा हीरो, जब हॅरी मेट सेजल,साहो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण मात्र  तिला लोकप्रियता ही ‘ये जवानी है दिवानी ‘ या  चित्रपटातून  मिळाली. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत काम केलं होतं.

हेही नक्की वाचा :

सूर्यास्ताचा आनंद घेताना अभिनेत्री पूजा सावंत | Actress Pooja Sawant Enjoying Sunset 

कमल हसन यांचा नवीन Digital प्रयोग, Metaverse मध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय सुपरस्टार.

कोण आहे बिग बॉस १५ मधली मायशा अय्यर ? 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts