जिना चढतांना जीव देखील जाऊ शकतो. सावध व्हा !

अनेकवेळा वयिस्कर मंडळीच काय तर तरुण धडधाकट युवा वर्गात ही समस्या तीव्र गतीने निर्माण झाल्याचे दिसते आहे. शिड्या चढताना धाप लागणं, छातीत धडधडणं, खूप घाम येणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना धावणे किंवा चालणे हा व्यायामाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. बहुतेक लोक इतर कोणत्याही व्यायामापेक्षा धावण्याला प्राधान्य देतात. कारण त्यात कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. 

 

प्रशिक्षकांचा असा विश्वास आहे की धावण्यासाठी चांगल्या दर्जाचे शूज खूप महत्वाचे आहेत, परंतु लोक त्यांच्या सोयीनुसार धावण्यासाठी बाहेर पडतात. काही लोक तर रिकाम्या पायी धावतात. पण आम्ही इथे शूजबद्दल नाही तर तुमच्या रनिंग स्टॅमिनाबद्दल सांगणार आहोत. कारण जलद धावण्यासाठी आणि लांबचे अंतर कापण्यासाठी शूजपेक्षा तुम्हाला चांगल्या दर्जाच्या पोषणाची गरज असते. 

 

हे तुम्हालाही जाणवतं ? 

 

हाय कॉलेस्ट्रॉल, हाय बीपी, लठ्ठपणा, मधुमेह किंवा महत्वाचं म्हणजे आपण कधी करत नसलेला व्यायाम यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आणि जिना चाडतांना कर छातीत अचानक जडजड वाटून दुखत असेल तर अश्यावेळी अटॅक येण्याचे चांचेस जास्त असतात. अशावेळी डॉक्टरकडे वारंवार तपासणीची गरज आहे. यामुळे भविष्यात हृदयाविषयीचा धोका दूर करू शकता. परंतु योगासने केल्यास हे सगळे प्रोब्लेम आपण चुटकीसरशी घालवू शकतो.

 

दुसरी गोष्ट म्हणजे जीने चढत असातांना किंवा जिना चढल्यानंतर कुठेतरी थांबावसं वाटत असेल. छातीत तीव्र गतीने धडधड होत असेल तर अश्यावेळी लगेच बसून आरामात पाणी प्यावे. तर शारीरिक व्यायाम आणि हालचालीची गरज आहे. तसेच धोका टाळण्यासाठी वेळोवेळी मेडीकल चेकअप करा.

 

स्टॅमिना शक्ती आणि उर्जा आहे जी आपल्याला दीर्घ कालावधीसाठी शारीरिक किंवा मानसिक कार्ये करण्यास अनुमती देते. तुमचा स्टॅमिना वाढल्याने तुम्ही एखादी क्रिया करत असताना तुम्हाला अस्वस्थता किंवा तणावाचा सामना करण्यास मदत होते. त्यामुळे थकवाही कमी होतो. जाणून घेऊया, स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावे ?

 

आहारात हे समाविष्ट करा.

 

एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बीटरूट खेळाडूंसाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात आढळणारे नायट्रेट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तप्रवाह नियंत्रित करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायचा असेल तर त्याचे सेवन सुरू करा. ही मूळ भाजी पोषक तत्वांनी भरलेली आहे आणि ते तुम्हाला वेगाने धावण्यास मदत करू शकते. त्यात जीवनसत्त्वे बी, सी आणि बीटा कॅरोटीन असतात. याशिवाय, आपले शरीर अधिक नायट्रिक ऑक्साईड तयार करते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढू शकते.

 

आरोग्यास कर्बोदके उत्तम

 

जर तुम्ही सकाळी खूप धावायला जात असाल तर ओट्सचे सेवन करा कारण त्यात चांगले कार्ब आहेत. बहुतेक कार्बोहायड्रेट्स वजन कमी करण्यासाठी वाईट मानले जातात. सर्व कार्बोहायड्रेट वाईट नसतात, तुम्हाला फक्त योग्य कर्बोदके निवडण्याची गरज आहे. ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि वजन कमी करण्यासाठी ते सर्वोत्तम अन्न मानले जाते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जावान आणि परिपूर्ण ठेवते.

 

अँटिऑक्सिडंट कुठून मिळेल ?

 

NIH मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्यायाम करण्यापूर्वी केळीचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते. केळीमध्ये भरपूर फायबर असते आणि ते कार्बोहायड्रेट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. केळी खाल्ल्याने व्हिटॅमिन बी 6 आणि अँटिऑक्सिडंटची पातळी वाढणे यासारखे इतर आरोग्य फायदे देखील आहेत असे अभ्यासातून दिसून आले आहे.

 

स्टॅमिना टिकवण्यासाठी हे खा 

 

ब्राऊन राईसमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत पचायला जास्त वेळ लागतो. अशावेळी ते तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. जे तुमच्या शरीराचा स्टॅमिना टिकवून ठेवण्यासही मदत करते.

 

पौष्टिक पालक 

 

थकवा येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव. जलद धावण्यासाठी आणि दम लागू नये यासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही पालकापासून सुरुवात करू शकता. पालकामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, के आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोह असते. जे तुम्हाला फिट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts