फेसबुक च नव डाटा लिक प्रकरण

अगदी काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता की, सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकचे ५३३ मिलियन म्हणजेच ५३.३० कोटीहून जास्त लोकांची डिटेल्स लीक झाली होती. या बातमीला काही दिवस उलटत नाही तोच आता एक नवीन रिपोर्ट समोर आली आहे. नवीन रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ५३३ मिलियन म्हणजेच ५३.३० कोटी युजर्सची नंबर्स लीक झाली आहेत. सायबर सिक्योरिटी फर्म मदरबोर्डच्या निकषांवर आधारीत व्हाइसची एक रिपोर्टनुसार, टेलिग्राम टूल्सच्या मदतीने हा डेटा लीक झाल्याची शक्यता आहे.

कशी झाली गोपनीय माहिती लीक?

टेलिग्राम बॉटसारखा दिसत असलेला टेलिग्राम टूल, युजर्संना पसंत पडत असलेल्या एका विशिष्ट पेजवर यासंबंधीचे नंबर शोधण्यासाठी पेमेंट करण्यास सांगितले जात आहे. मदरबोर्डचा दावा आहे की, त्यांनी टूलला व्हेरिफाय केले आहे. हे नुकतेच ५३३ मिलियन युजर्सचा डेटाबेस पेक्षा वेगळ्या नंबर्सचा डेटाबेस आहे. म्हणजेच दोन वेगळ्या डेटाबेस आहे. या नवीन डेटासेट नंबरचा समावेश आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, बॉटसाठी एक विवरण देण्यात आले आहे. ज्यात लिहिले आहे की, ही बॉट फेसबुकला पसंत करणाऱ्या युजर्संना फोन नंबर देते. फेसबुकवर हजारो लाइक्सच्या पेजची किंमत काही डॉलर असू शकते. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, बॉटचा वापर करण्यासाठी युजर्संना फेसबुक पेजचे युनिक आयडेंटिफिकेशन कोडला ओळख होणार आहे. याच्या फोन नंबरला मिळवता येऊ शकते. मदरबोर्डच्या माहितीनुसार, ग्राहकांना त्या कोडला बॉटमध्ये नोंद केल्यानंतर त्यांना डेटाची किंमत सांगितली जाते. तसेच खरेदीचा पर्याय दिला जातो.

रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, फेसबुक पेजेसवर १०० लाइक्स आहे. त्यांचा डेटा बॉट फ्री मध्ये देत आहे. हा डेटा एक स्प्रॅडशीटमध्ये बनवला आहे. ज्यात युजर्से पूर्ण नाव, फोन नंबर, लिंगची माहितीचा समावेश आहे. यात हेही म्हटले की, बॉट आवश्यक रुपात त्या सर्व युजर्संचा डेटा प्रदान करीत नाही. जे पेज लाइक करते. ५० लाइक पेजसाठी बॉटने १० युजर्ससाठी एक स्प्रेडशीट बनवली आहे.


स्वतः फेसबुक चे सर्वे सर्वा मार्क यांचा ही डाटा झाला होता लीक:

फेसबुकच्या इतिहासात सर्वात मोठा डेटा ब्रीच झाला आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, फेसबुकचे युजर्सचा हॅक केलेला डेटा ऑनलाइन फ्री मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. युजर्सच्या खासगी डेटात जन्म तारीख, संपूर्ण नाव, बायो, लोकेशन, आणि ईमेल आदीचा समावेश आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये हेही म्हटले की, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा फोन नंबर आणि खासगी माहिती सुद्धा या डेटात लीक झाली आहे. ते स्वतः आता मोबाईल आणि लॅपटॉप ला असलेले कॅमेरा आणि माईक चिकट पट्टी वापरून बंद करून आपले काम करत असतात असे अनेकवेळा दिसले आहे. नेटकर्यानी काळजी घ्यावी असे या बातमी मधून ‘मराठीshout’ चे आवाहन आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts