शेतकरी आंदोलन: ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्ग हिची जगभरात पर्यावरणवादी म्हणून ओळख आहे. रिहानाच्या पाठोपाठ ग्रेट थनबर्गने केलेल्या टि्वटमुळे जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे टि्वट केले होते.

एफआयआरमध्ये ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया कलम गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले

देशात  गेल्या काही दिवपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले दिसत आहे. रिहाना, ग्रेटा थनबर्गच्या टि्वटनंतरबॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतातील आंदोलनाबद्दल टि्वट करणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts