थंडीत आपल्या पायांची ‘अशी’ काळजी घेतली तर पाय सुद्धा सुंदर दिसतील.

हिवाळ्याच्या थंडीमध्ये संपूर्ण शरीर थंड पडलेले असते. शिवाय थंडीमुळे जास्तवेळ अंघोळीला देत नाही. लवकरच अंघोळ करून घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे कित्येकदा शरीर काळवंडले जाते. शिवाय पाय सुध्दा काळे दिसतात. पायांना भेगा, आणि त्वचा फाटली जाते. त्वचेला खाज सुध्दा सुटते. आपल्या पायांना सुरक्षित आणि सुंदर ठेवण्यासाठी आम्ही आज काही सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय वाचल्याने हिवाळ्यात तुमचे पाय अगदी सुंदर दिसतील. तर बघूया यातील पहिला उपाय. 

 

मिठाच्या पाण्यात पाय घाला.

 

सकाळी उठल्यावर फारच थंडी असते त्यामुळे आपले हात पाय आणि संपूर्ण शरीर थंड झालेलं असतं शिवाय सकाळी थंड उठायला सुद्धा कंटाळा येतो त्यामुळे आपले शरीर झटपट गरम करण्यासाठी एक चांगला आणि शरीरासाठी आरोग्यवर्धक उपाय म्हणजेच गरम पाण्यामध्ये खडेमीठ टाकून त्यात थोडावेळ पाय ठेवल्यास शरीरातील अनेक दुखण्याला आराम मिळतो. शिवाय पाय स्वच्छ होऊन, सुंदर दिसतात. 

 

ऑइलचा वापर करा

 

तुमच्या पायांवर वेदनादायक भेगा पडल्यासारख्या प्रभावित भागात ऑलिव्ह ऑइल लावल्याने त्वचेचे पोषण होईल आणि ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होईल. यासोबतच हे लावल्याने तुम्हाला आराम वाटेल. जर तुमच्याकडे नारळ तेल असेल तरीही चालेल. नारळ तेलाने पायांची मालिश केल्याने पाय मुलायम होतात. आणि सुंदर दिसतात.

 

ग्लिसरीनचा वापर

 

थंडी असली की बहुतांश लोक ग्लिसरीनचा वापर वापर करतात. आणि ही सवय खूप चांगली आहे. ग्लिसरीन लावल्याने त्वचा तर मुलायम होतेच शिवाय त्वचा उजळते हे देखील तितकेच खरे आहे. ग्लिसरीन घरी नसल्यास त्वचा मऊ आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी तुमच्या पायांवर जेंटल मॉइश्चरायझर वापरा. असे केल्याने तुम्ही हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळू शकाल. 

 

चांगल्या दर्जाचे मोजे 

 

मार्केटमध्ये अगदी खराब गुणवत्ता असलेले कमी दर्जाचे वुलन वापरून बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. त्यांनी पायाला काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा चांगल्या प्रतीचे, किंवा सूती मोजे घालून आपल्या पायांचे कठोर हवामान, प्रदूषण आणि धुळीपासून संरक्षण करा. शिवाय कॉटनचे मोजे हवेचा प्रवाह नियंत्रित करतात आणि तुमच्या पायांना वास येण्याची शक्यता कमी असते. आणि पाय गरम ठेवण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रतीच्या वूलनचे मोजे खरेदी करू शकता.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts