स्मार्टफोन चोरी झाल्यास करा ‘या’ टीप्स आणि ट्रिक्स फॉलो.

स्मार्टफोन चोरी झाल्याच्या घटना काही नव्या नाही. परंतु जर तुमचा स्मार्टफोन चोरी गेला असेल तर आता घाबरून जाण्याची गरज नाही. स्मार्टफोन चोरीला गेल्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र, सोबतच खासगी डेटा लीक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चोरीला गेलेला स्मार्टफोन मिळवायचा कसा असा प्रश्न निर्माण होतो. पण आता चोरीला गेलेला मोबाईलही आपल्याला सहजपणे ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी एक अँड्रॉइड ॲप आपल्याला उपयोगी पडणार आहे.

 

आपला फोन चोरल्यानंतर सर्वप्रथम चोरटे फोन स्विच ऑफ करुन त्यातील सिम कार्ड काढून टाकतात. त्यामुळे मग फोन ट्रॅक करणं अवघड जातं. त्यामुळे फोन चोरीला गेल्यानंतर पोलिसांची मदत घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण ‘Track it EVEN if it is off’ या अँड्रॉइड ॲपचा वापर करुन आपल्यालाही फोन ट्रॅक करणं सोपं जाणार आहे. अँड्रॉईड युजर्स हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. त्याचे रेटिंग देखील खूप चांगले आहे. हे हॅमर सिक्युरिटीने विकसित केले आहे. त्याची सेटअप प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्यामुळें तुम्ही हे ॲप अगदीं निश्चिंतपणे डाऊनलोड करू शकता. आणि यानंतर तुम्ही आपला हरवलेला मोबाईल ट्रॅक करून मिळवू शकता. 

 

ॲपचा वापर कसा कराल ? 

 

सर्वात प्रथम एक जागरूक नागरिक म्हणुन आपला मोबाईल चोरी गेल्याची माहिती रीतसरपणे पोलीसांकडे तक्रार दाखल करा. आणि आता ‘Track it EVEN if it is off’ या अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्यानंतर, ते उघडा आणि काही परवानग्या द्या. यात डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो बंद होत नाही, तर चोराने फोन बंद केला आहे. हे ॲप फोनचे लाईव्ह लोकेशनही पाठवत राहतं. यामुळे त्याचा मागोवा घेणे खूप सोपे होते. तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हे एक अतिशय उपयुक्त ॲप आहे. फोन चोरीला गेल्यास हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. 

 

सोबतच तुमचे पासवर्ड आधी बदला 

 

तुमचा Google खाते पासवर्ड हा तोच पासवर्ड आहे जो तुम्ही Chrome आणि Gmail व YouTube यांसारख्या इतर Google उत्पादनांसाठी वापरता. क्लिष्ट पासवर्ड तयार करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

 

तुमचे Google खाते उघडा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.

“सुरक्षा” विभागामध्ये, Google मध्ये साइन इन करा निवडा.

पासवर्ड निवडा. तुम्हाला पुन्हा साइन इन करावे लागू शकते.

तुमचा नवीन पासवर्ड एंटर करा, त्यानंतर पासवर्ड बदला निवडा.

 

अश्याप्रकारे या सेटिंग्ज तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून करून आपले खाजगी गोष्टी सेफ ठेऊ शकता. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts