Drone Delivery:  ड्रोन करणार आता  फूड डिलिव्हरी

ड्रोन द्वारे फूड डिलिव्हरी करण्याचा यशस्वी प्रयोग 5 शहरात करण्यात आला आहे. याआधी Amazon  ने ड्रोन द्वारे पार्सल डिलिव्हरी करण्याचा प्रयोग केला आता हा प्रोयोग Swiggy आणि Zomato द्वारे फूड करण्यात आला. 

ड्रोन हा पूर्णपणे लॉक असेल आणि ज्या ग्राहकांना ड्रोन द्वारे डिलिव्हरी दिली त्यांना एक ओटीपी देण्यात येईल. या ओटीपीचा वापर करून हा लॉकर उघडण्यात येईल. यामुळे डिलिव्हरी करण्यात येणाऱ्या सामानाची  सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येईल .

तुमच्या घराच्या बाहेर खिडकी वर आता तुम्हाला  स्विगी (Swiggy)  आणि  झोमॅटो  (Zomato) चे डिलिव्हरी ड्रोन बघायला मिळेल तुम्ही जेवण मागवले असेल आणि काही वेळाने तुम्हाला तुमच्या खिडकीच्या बाहेर ड्रोन दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका. लवकरच ही गोष्ट सत्यात उतरणार आहे.

ड्रोन डिलिव्हरीसाठी अनेक कंपन्या तयारी पूर्ण करत आहेत. तुम्ही जर  कोणत्या इतर e-commerce   स्टोअर्स मधून सामन मागवले असल्यास ते समान ड्रोन द्वारे तुमच्या घरी पोहोचवले जाऊ शकते पुढील काही वर्षात या संकल्पना प्रत्यक्षात कार्य करताना तुम्हाला बघायला मिळतील.  

लास्ट माईल डिलिव्हरी कंपनी झेप इलेक्ट्रिक (Zypp Electric) ही कंपनी हा ड्रोन लॉजिस्टिक सेक्टरमध्ये उत्तरावण्यास पूर्णपणे तयार आहेत.इलेक्ट्रिक वाहनाद्वारे वितरण करणार्‍या या कंपनीने ड्रोनद्वारे वस्तू वितरीत करण्यासाठी टीएसएडब्ल्यू (TSAW) ड्रोनशी हातमिळवणी केली आहे. पहिल्या टप्प्यात ही कंपनी आपले २०० ड्रोन बाजारात उतरवणार असल्याचे कळते. सध्या दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात या मोठ्या शहरात   हे ड्रोन डिलिव्हरी चे कार्य करतील.

ड्रोन द्वारे डिलिव्हरी करणाऱ्या कंपनी मध्ये टीएसएडब्ल्यू (TSAW) ड्रोन्स ही कंपनी डिलिव्हरी करणारे ड्रोन तयार करते. डिलिव्हरीसाठी वापरले जाणारे अनेक ड्रोन या कंपनीने आधीच तयार केलेले असून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर डिलिव्हरी ड्रोनच्या दोन मॉडेल्सची माहिती देण्यात आली आहे. पहिला मॉडेल ‘मारुती २.०’ (Maruthi 2.0) आहे जो कमी अंतराच्या (४० किलोमीटर) डिलिव्हरीसाठी वापरण्यात येईल. तर दुसरा ड्रोन ‘अदारणा’ची (Adarna) डिलिव्हरी रेंज ११० किलोमीटर इतकी आहे. हे दोन्ही मॉडेल ५ किलोपर्यंतचा भार उचलू शकतात.

 

डिलिव्हरी ड्रोनमध्ये असेल स्मार्ट लॉकर : 

 

 डिलिव्हरीसाठी उतरवण्यात येणाऱ्या ड्रोनमध्ये स्मार्ट लोकर असेल असेल. ज्या ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार असेल त्यांना एक ओटीपी देण्यात येईल. या ओटीपीचा वापर करून हा लॉकर उघडण्यात येईल.  ड्रोनने डिलिव्हरी करण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल. अशे झेप इलेक्ट्रिक (Zypp Electric) कंपनी चे म्हणणे आहे. 

 

गल्लोगल्ली  ड्रोनने डिलिव्हरी  करणे जे  अद्याप शक्य नाही : 

 

हे ड्रोन फक्त शहरातील अपार्टमेंटमध्येच नाही तर रिमोट लोकेशनला पण डिलिव्हरी करतील. स्वतःहून लोकेशन ट्रॅक करण्याची टेक्नॉलॉजी या ड्रोनमध्ये असणार. याव्यतिरिक्त या डिलिव्हरी ड्रोनमध्ये रिमोट-आयडी (रिमोट-आयडी) आणि डिटेक्ट अँड अव्हॉइड (DAA) सारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. ही टेक्नॉलॉजी ड्रोनला हवेत उडणारी वस्तू आणि बिल्डिंगपासून वाचण्यास मदत करते . सध्या ही सुविधा बहुमजली इमारतींमध्ये सुरु करण्यात येणार मात्र  छोट्या गल्ल्यांमध्ये ड्रोन पोहोचवण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रस्त्यावरील तारांचे जाळे. त्यामुळे अशा परिसरांमध्ये ड्रोन चालवण्यात अडचणी येऊ शकतात.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts