लग्न म्हणजे आपल्याकडे आनंदाची बाब. अनेकांचे मान सन्मान आणि इच्छा पुऱ्या करण्याचा सोहळा. आपण अनेक लग्नात अहेर किंवा भेटवस्तू देऊन आशीर्वाद देत असतो. भेटवस्तू देण्या मागचा हेतू आपला स्पष्ट असतो तो म्हणजे जोडप्याच पुढील आयुष्य सुखकर व्हावा हा इरादा.
पण यंदाच्या या महागाई युक्त लग्न हंगामात आपल्या मित्राला भेटायला आलेल्या मित्रांनी चक्क डिझेल आणि पेट्रोल च्या बाटल्या दिल्या. गिरीश कुमार आणि कीर्तनाची लग्नगाठ , छेनागालपट्टू या तामिळनाडू येथील जिल्ह्यात बांधली गेली. सद्यस्थितीत हा लग्न सोहळा फार रंजक वळणावर येऊन सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. अनेकांची पसंती ही या नव्या इंधन भेट म्हणून देणाऱ्या पद्धतीचे होत आहे. असे काळजी घेणारे मित्र सगळ्यांना मिळो अशी मराठी shout ची टीम प्रार्थना करत आहे. बघा हा व्हिडिओ.
अश्याच भन्नाट बातम्या वाचनासाठी आमच्या मराठी shout च्या पेज ला भेट देत रहा, आणि अश्याच काही वेगळ्या कृप्त्या काढून आपल्या मित्रांनाही आनंदी ठेवा.