गौरी गणपतीचे नाते काय ? लगेच जाणून घ्या ही रहस्यमय गोष्ट.

बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की गौरी गणपती यांचं नातं काय आहे ? बरीच मंडळी बऱ्याच भागांमध्ये गौरी ही गणपतीची बहीण आहे असे मानतात. तर बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची आई आहे असे देखील मानतात. पण मग यामागे नक्की रहस्य काय गणित काय ? हे सांगण्यासाठी हा आजचा लेख तुमच्यासाठी खास आहे. 

 

वास्तविक पाहता गणपतीला गौरीनंदन असं देखील म्हटले जाते. गौरीनंदन म्हणजे पुत्र. किंवा गौरीसूत असं देखील म्हटलं जातं. याचाच अर्थ असा आहे की गणपती हा गौरीचा पुत्र आहे म्हणजेच मुलगा आहे. म्हणजे गौरी ही गणपतीची आई आहे. आणि अर्थात पार्वतीचं दुसरं नाव हे गौरी आहे. हिंदू देवता शास्त्रात तसेच समाजजीवनामध्ये गौरी ही शिवाच्या शक्तीचा आणि गणपती बाप्पांच्या आईचं रूप मानल्या गेलं आहे. काही ग्रंथांमध्ये द्वादश गौरींचा उल्लेख आहे. तर अग्नीपुराणांमध्ये गौरी मूर्तीचं सामूहिक पूजन केलं जात असते. आणि त्याला खूप महत्त्व त्यानुसार आहे. त्यामुळे या एकूण दहा दिवसांमध्ये फक्त एका गणपतीचीच पूजा नसते तर तीन दिवस गणपपतीच्या मातांची देखील पूजा करतात. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन माता कश्या ? हो, कारण गणपतीला द्वैमातुर असे म्हटले जाते. गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती. आणि दुसरी आई म्हणजे गंगा. पार्वतीने आपल्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढला. आपली मोठी बहीण गंगेचे पाणी लावून तो काढला. आणि त्याची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले. म्हणजेच एकंदरीत या दोन देव्यांचा अंश त्यात होता. म्हणून या गंगा आणि गौरी या दोन्ही गणपतीच्या माता आहेत. महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठागौरी म्हणजेच गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे पार्वती म्हणून आवाहन करून त्याची स्थापना करत असतो. सोबत जे बाळ कानिष्ठेच्या सोबत असतं ते म्हणजे विनायक. पण गणपती नाही ! कारण पार्वतीने जेव्हा त्या मूर्तीत प्राण फुंकले होते तेव्हा ते बाळ होते. गणपतीला जेव्हा हत्तीचे मुख लावले गेले तेव्हा ते गणपती असे म्हटले गेले. आणि या बाळाला विनायक म्हटल्या गेलं. आता विनायक म्हणजे विना नायकाचं मुल. म्हणजे तो पतीशिवाय जन्माला आलेला आहे असा विनायक. मग आता प्रश्न असा पडतो की या गंगा आणि गौरी आहेत तर यांना महालक्ष्मी बसवल्या असं का आपण म्हणतो ? तर याचे उत्तर म्हणजे ‘लक्ष्मी’ आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव. या दोघी माता ने गणपतीस जन्म देऊन एक प्रकारे वैभव आणलं. निर्वीघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली. आणि म्हणून यांना महालक्ष्मी असं म्हणतात. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरींच पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. आणि हे व्रत तीन दिवस चालतं. खरंतर प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या व्रत करण्याच्या पद्धती आहेत. आता पूजेत काही ठिकाणी धातूची प्रतिमा तर काही ठिकाणी मातीची प्रतिमा काही ठिकाणी तर कागदावर महालक्ष्मीचे चित्र काढून आणि काही ठिकाणी नदी काठचे पाच खडे आणून त्यांचं गौरी म्हणून पूजन केलं जातं. तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुलं या ऋतूत येणाऱ्या वनस्पतींची रोपं तेरड्याची रोपे एकत्र बांधून सुद्धा त्याची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्यानंतर त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने ती मूर्ती सजवतात. मग एक दिवस आवाहन, स्थापना, दुसऱ्या दिवशी भोजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा पद्धतीने या महालक्ष्मी गणेशासहित आपल्याकडे बसत असतात. 

 

तर अश्याप्रकारे तीन दिवस आनंद उत्साह, हर्ष उल्ल्हासासह हे महलक्षमींचे तीन दिवस कसे जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. तर अश्या प्रकारे आज आपण गौरी गणपती, पार्वती, आणि महालक्ष्मी यांचे साविस्तर नाते काय हे आजच्या महत्त्वपूर्ण लेखातून जाणुन घेतले.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts