नवी दिल्ली -कोरोनच्या महामारीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर रुळावर येताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत अर्थव्यवस्था कोरणामुळे घसरलेली बघायला मिळाली होती मात्र ओक्टोम्बर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या एकूण देशांतर्गत जीडीपी ०.४ टक्क्यांनी वाढलेली आहे.
यात कृषी क्षेत्राचा जास्त वाट आहे . प्रामुख्याने कृषी ,बांधकाम आणि सेवा क्षेत्राच्या सकरात्मक कामगिरीमुळे ही गोष्ट शक्य झाल्याचे आकडेवारीवरून कळते . यामुळे देश मंदीच्या अवस्थेतून बाहेर येण्याची चिन्ह दिसू लागले आहे .
राष्ट्रीय सांख्यिक कायालये (एनएसओ ) ने देशाच्या जीडीपी ची आकडेवारी प्रस्थापित करत सकारात्मक वाढीचे संकेत दिले. जीडीपी ची वाढ पहिल्या दोन तिमाहीनंतर प्रथमच सकरात्मक झालेली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत (-७.५) टक्के होती. वर्ष २०१९-२०२० च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ३.३ टक्के वाढ झाली होती त्यावेळी जीडीपी ३३. ०८ लाख कोटी रुपये होता आणि तो आत २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ३६. २२ लाख कोटी असल्याचे वर्तवले गेले आहे याचा अर्थ त्यात ०.४ टक्क्यांनी वाढ झालेली दिसते