आपल्या राज्यात अनेक मुलांना शाळेची फी वेळेवर न भरल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो पण ,उत्तर प्रदेश बदायूं येथील एका मुलीला तिच्या आधार कार्डावर नावात चूक झाल्यामुळे सरकारी शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता,
मुलीच्या आधार कार्डमध्ये तिचे नाव “मधू का पंचवा बच्चा (मधूचे पाचवे अपत्य)” असे नमूद केले होते.
“मी माझ्या मुलीचे नाव नोंदवण्यासाठी एका सरकारी शाळेत गेलो होतो. माझ्या मुलीच्या आधार कार्डावर नमूद केलेल्या नावाची शिक्षिकेने खिल्ली उडवली कारण ती माझी पाचवी मुल आहे आणि तिला तिथे प्रवेश दिला नाही,” असे मुलीची आई मधु म्हणाली.
मुख्यमंत्री कार्यालयाचा दणका, शाळा प्रशासन घाबरले!!!
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली.”बुदौन जिल्ह्यातील रायपूर गावचा दिनेश आपली मुलगी आरतीला शाळेत प्रवेश देण्यासाठी गेला होता. आरतीच्या आधारकार्डमध्ये तिचे नाव ‘मधु का पंचवा बच्चा’ असे लिहिले होते, त्यामुळे शाळेने तिला प्रवेश दिला नाही. मुख्यमंत्र्यांनी, त्यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला मुलीला ताबडतोब शाळेत प्रवेश देण्याचे निर्देश दिले,” उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने पत्रकात म्हटले आहे.अश्याच अनेक ट्रेडिंग बातम्यांसाठी आमच्या ” मराठी shout ” च्या Facebook आणि Instagram अकाउंट्स ला लगेच फॉलो करा