ऑनलाईन पैश्यांची फसवणूक झाली आहे, तर अशी करा तक्रार.

आजकाल अनेक ऑनलाईन फसवेगिरी चे प्रकरण आपल्याला बघायला मिळतात. त्यातच बँकेतून वाढते ऑनलाईन ट्रांसॅक्शन , ऑनलाईन पेमेंट,यामुळे अनेक लोक आपले बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असून, फसवेगिरी होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

देशातील सरकार आणि बँका यांच्याकडून लागोपाठ लोकांना अलर्ट राहण्याची सूचना वेळोवेळी करता येते. जर कोणी फ्रॉडचा बळी गेले असेल तर त्यांना तात्काळ तक्रार करण्याची सूचना केली जाते. लोकांसोबत ऑनलाइन फ्रॉड होऊ नये, त्यांचे पैसे सुरक्षित राहता यावे यासाठी गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीसच्या सायबर सेलने एकत्र मिळून काम सुरू केले आहे.

तर अशी घ्या मदत..

पोलिसांच्या सायबर सेल आणि गृह मंत्रालयाने लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केले आहे. या ठिकाणी कोणताही ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तात्काळ तक्रार करता येऊ शकते. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांची सायबर सेलने मिळून १५५२६० हेल्पलाइन सुरू केली आहे. जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फ्रॉड झाला असेल तर तात्काळ या नंरबरवर तक्रार करू शकता. यावर कॉल करू शकता.

यानंतर ७ ते ८ मिनिटात अकाउंटवरून काढण्यात आलेली रक्कम ज्या दुसऱ्या अकाउंटमध्ये गेली आहे. त्या हेल्पलाइनवरून त्या बँक किंवा आर्थिक संस्थेला अलर्ट मेसेज मिळेल. त्यानंतर पैसे होल्डवर जातील. गृह मंत्रालयच्या सायबर पोर्टल आणि दिल्ली पोलिस सायबर सेल सोबत १५५२६० पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षापासून ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी सुरू करण्यात आला होता. आता हे फुल पॉवर सोबत लाँच करण्यात आला आहे.

ऑनलाईन ट्रांसॅक्शन्स ची माहिती जपून ठेवा:

सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या हेल्पलाइनची दहा लाइन आहे. म्हणजेच कॉल करणाऱ्यांना हा नंबर बिझी मिळणार नाही. ज्यावेळी कोणताही व्यक्ती हेल्पलाइन नंबरवर कॉल करेल. तर त्यावेळी त्याला त्याचे नाव, नंबर आणि फ्रॉडची वेळ विचारली जाईल. माहिती एकत्रित केल्यानंतर त्यासंबंधित जोडलेले पोर्टल, संबंधित बँक किंवा अर्थ संस्थेला पोहोचवली जाईल. ज्यावेळी फ्रॉड झाला त्यावेळी तात्काळ तक्रार केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

ऑनलाईन सेवा वापरताना काळजी घ्यावी. कोणालाही आपले ATM पिन आणि बँकेतून पाठवलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. या सर्व खबरदारी घेतल्यास आपण स्वतःच ऑनलाईन ट्रांसॅक्शना न लुबडता चांगल्या प्रकारे वापरू शकू.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts