Google चे हे फिचर्स वारण्यासाठी तुम्हाला इंटरनेट ची गरज नाही , जाणून घ्या हे फिचर्स…!

Google हे जगभरातील अनेक लोकांना सेवा पुरवण्याचं काम करते . आपला स्मार्टफोन हा संपूर्ण पणे गुगलवरतीच चालतो. फोनमधील ऍप्सपासून ते ब्राउझरवरती सर्च करण्यापर्यंत या सगळ्यासाठी आपण नेहमी गुगलचाच वापर करतो. परंतु,आपल्याला गुगल चालवण्यासाठी इंटरनेटची आवशकता असते. सुरुवातीला फोन वापरण्यासाठी आपल्याला फारशी इंटरनेटची गरज नसायची परंतु आता मात्र तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुमच्यासाठी इंटरनेट असणे गरजेचं आहे. इंटरनेट शिवाय तुमचा फोन काहीही कामाचा नाही. इंटरनेटशिवाय आजच्या घडीला आपण आपले महत्वाचे काम करू शकत नाही

परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गुगल एक अशी सर्वीस देत आहे. जी वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवशकता नाही. म्हणजे तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तरी देखील तुम्ही गुगलची ही सर्विस वापरु शकता. या सर्विसचं नाव आहे Google Maps, हे ऍप वापरकर्त्यांना मार्ग दाखवते. आणि Google Maps हे तुम्ही ऑफलाइन देखील वापरू शकता.

गुगल मॅपमध्ये नकाशा सेव्ह करण्याचे फिचर्स आहे, ज्याच्या मदतीने तो ऑफलाइन देखील वापरू शकतो . जर तुम्ही एखाद्या दुर्गम भागातून जात असाल आणि तिथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लेम असेल तर अश्या वेळेस Google Map चे हे फिचर्स अतिशय उपयुक्त ठरते . अशा परिस्थितीतही गुगल मॅपचे हे फीचर तुम्हाला मार्ग दाखवत राहील त्यासाठी इंटरनेट ची गरज नाही .

परंतु हे लक्षात ठेवा की, तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा हा मॅप सेव्ह केला असेल, त्यावेळेची तुम्हाला माहिती मिळेल. परंतु या ऑफलाइन मोडमध्येही, तुम्हाला पर्यायी मार्ग आणि इतर वैशिष्ट्य फीचर्स मिळणार नाहीत.

Google Maps ला आपण ऑफलाइन कसे वापरू शकतो :

सर्व प्रथम, तुम्हाला तुमच्या स्मार्ट होणामध्ये Google Maps हे ऍप उघडावे लागेल आणि नंतर प्रोफाइल या चिन्हावर क्लिक करावे लागेल हे ऑपशन तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात मिळेल जिथे तुम्हाला ऑफलाइन नकाशांचा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सिलेक्ट युवर ओन मॅप या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय आहे ते ठिकाणं टाकावं लागले आणि त्यानंतर हा मॅप डाऊनलोड करुन ठेवा. नकाशा निवडल्यानंतर, यूजर्सला डाउनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल. लक्षात ठेवा की, तुम्ही डाउनलोड करून ठेवलेला ऑफलाइन नकाशावरील रस्ते काही दिवसांना बदलू किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नकाशा रिसेंट करून परत वरती डाऊलोड करा. फारपूर्वी डाऊलोड केलेला मॅप अजिबात वापरू नका.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts