आता गुगल सांगणार टोल टॅक्स कुठे किती लागणार…

आपल्या भारतीयांच्या आवडत्या नेव्हिगेशन अॅप Google Maps मध्ये काही नवीन अपडेट्स जोडले आहेत. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे टोल टॅक्स. या फीचरद्वारे यूजर्सना प्रवास सुरू करण्यापूर्वी वाटेत टोलवर किती कर भरावा लागेल हे पाहता येणार आहे. यासाठी गुगलने स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी केली आहे. नवीन सुविधेद्वारे, तुम्हाला टोल मार्ग निवडायचा की नॉन-टोल मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवू शकणार आहात.

तुम्हाला नाही द्यायचा टोल,मग करा असा झोल…

तुम्हाला जर टोल टाळायचा असेल तर गुगल मॅप तुम्हाला त्याचा मार्गही सांगेल. येथे तुम्हाला टोल व्यतिरिक्त टोलमुक्त मार्गाचा पर्याय सांगितला जाईल. मात्र, यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये टोल टॅक्स टाळा हा पर्याय सक्षम करावा लागेल.

ऑनलाईन भरा टोल.

टोल टॅक्सच्या खर्चाची कल्पना येण्यासाठी गुगल मॅप काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे परीक्षण करणार आहे. ही किंमत टोल पास किंवा पेमेंटच्या इतर कोणत्याही पद्धतीवर, आठवड्याचा दिवस आणि टोल पास करण्याची अंदाजे वेळ यावर अवलंबून असेल. भारतासह यूएस, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे २,००० टोल रस्त्यांसाठी या महिन्यात अँड्रॉइड आणि ऍपल आयओएस वर टोलच्या किमती दाखवायला सुरू होतील.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts