GST मुळे या वस्तू व सेवा झाल्या महाग ! लगेच जाणून घ्या.

१९ जुलै २०२२ : 

खरंतर जिएसटी’ म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टैक्स. हा टॅक्स १ जूलै २०१७ पासून भारतात लागू झाला. आणि सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागेल, असा गैरसमज निर्माण होत होता. परंतु हळू हळू हाच गैरसमज सत्यात उरतो की काय याची भीती आता सर्वांना वाटते आहे.

आधीच महागाईचा भडका उडाल्याने आता पुन्हा त्यात भर पडली आहे. थोडक्यात, किरकोळ महागाई आणि घाऊक महागाईत किंचित नरमाई आल्यानंतर दिलासा मिळण्याची आशा असलेल्या सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी आहे. सोमवारपासून घरगुती वापराच्या अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला आधी कमी पैसे द्यावे लागायचे त्यासाठी आता तुम्हाला थोडा अधिक खिसा सोडावा लागेल. सोमवारपासून पनीर, दही, लस्सी आणि ताक आदी पदार्थ महागल्या आहेत.

जीएसटी कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पॅकेज केलेले दही, लस्सी आणि ताक यासह काही खाद्यपदार्थांवरील जीएसटीमधून सूट रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीडीटी) ही शिफारस सोमवारपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पॅकेज केलेले ब्रँडेड दूध उत्पादने महाग झाल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या वस्तूंवरील सूट संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागणार आहे. मात्र, ज्या वस्तू पॅक केलेल्या नाहीत किंवा कोणत्याही ब्रँडमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना जीएसटीमधून सूट दिली जाईल. आता बघुयात नेमक्या कोणकोणत्या वस्तू आणि सेवांवर अतिरिक्त GST लावल्या जाईल.

१) प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, पनीर, मध आणि धान्य यांच्यावरील जीएसटी सूट आता रद्द करण्यात आली आहे. या वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल.

२) सोमवारपासून चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.

३) आता 5,000 रुपयांच्या वर असलेल्या रुग्णालयाच्या खोलीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. यावर ५ टक्के जीएसटी भरावा लागेल.

४) मॅप, ॲटलस आणि ग्लोबवर १२ टक्के दराने जीएसटी लागू होईल.

५) एलईडी लाईट, फिक्स्चर आणि एलईडी दिवे यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. आता यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यापूर्वी या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी होता.

६) ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे इत्यादींवरील जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे.

७) छपाई, लेखन किंवा शाई, इलेक्ट्रिक वॉटर पंप आता महाग होणार आहेत. सायकल पंपाची किंमतही वाढणार आहे. आता त्यांच्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे

८) गिरण्या, पवनचक्की, पाणचक्की यांमधील धान्याची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांना अधिक जीएसटी भरावा लागेल.

 

९) अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी यंत्रे आणि डेअरी उद्योगात वापरल्या जाणार्‍या यंत्रांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.

१०) सोलर वॉटर हिटरही महागणार आहेत.

११)तयार लेदर आणि कंपोझिशन लेदरवर १२ टक्के जीएसटी लागू होईल.

१२) १००० रुपयांपर्यंतच्या हॉटेल खोल्यांवर १२ टक्के कर आकारला जाईल. यापूर्वी यावर सवलत होती.

१३)रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी इत्यादींच्या करारांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.

 

तर अश्याप्रकारे विविध वस्तू आणि सेवांवर वाढीव दराने GST दर आकारला जाणार आहे. परंतु सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा हा फटका खिश्याला कात्री लावणारा आहे हे मात्र नक्की. 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts