गुढी पाडव्याचे महत्त्व जाणून घ्या..

 

या दिवसापासून मराठीनव वर्षसुरूहित. मराठी संस्कृतीत या सणाला फार महत्व आहे.गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते.


संत एकनाथांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की आपल्यापरंपरेत आणि संस्कृतीत गुढीचे महत्व अलौकीक आहे.

शेती विषयक महत्व:


नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात. आंब्यांच्या पानाची या काळात गुढीला वाहण्याची प्रथा आहे.

अभ्यंगस्नान आणि तांब्याच्या भांड्याचे महत्व:

सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे, असे भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने रज-तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठविल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. ताब्यांचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरींनी संस्कारीत तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते, अशी मान्यता आहे.


आरोग्यदृष्ट्या असणारे कडुनिंबाच्या पानाचे  महत्व:

कडुनिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्या महाराष्ट्रात प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

गोड गाठ्यांचे महत्व:

या काळी  सूर्य आपली आग खूप जास्त ओकत असतो. त्यात अनेकांना उष्मघाताचा त्रास होऊ नये म्हणून साखरेच्या गाठ्या खाणे आणि गुढीला अर्पण करणे फायद्याचे ठरते. या गाठ्या थंड असल्याने आपले शरीर उष्मा पासून बचाव करतात.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts