हार्दिक पांड्या झाला भावूक. रडण्याचे कारण होते वेगळे…

भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच हुरहुर लागली असते अर्थातच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारत अनेकदा आपली भारतीय टीम जिंकलेली आहे. आणि आजही क्रिकेट प्रेमींसाठी खास दिवाळी गिफ्ट म्हणून भारतीय क्रिकेट टीम जिंकलेली. टी-२० विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने चित्तथरारक विजय मिळवला. यात विराट कोहली आणि आणि हार्दिक पंड्याची भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरली. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ११३ धावांची ही खेळी केली. या रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघाने भारतीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली. या शानदार विजयानंतर हार्दिक पंड्या अंत्यत भावुक झाला. आजच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हार्दिकच्या डोळ्यातून अश्रू ओघळले

 

सध्या चर्चेत असलेला आणि भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेला हार्दिक पंड्या हा सहसा कधी भावनांमध्ये वाहून जाणारा खेळाडू नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो एक बोल्ड, धाडसी असा खेळाडू आहे. मात्र, आज रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना इतका अटीतटीचा आणि रोमहर्षक होता की या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हार्दिकलाही आपल्या डोळ्यांमधील अश्रू रोखताच आले नाही. त्यावेळी मीडिया आणि प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावर होत्या. 

 

भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच ही नेहमीच रंगतदार होते. आणि यातच पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांची आवर्जून आठवण काढली. आजचा सामना, आमची माझी खेळी माझ्या वडिलांना खूप आवडली असती. मला क्रिकेटचे चांगली प्रशिक्षण मिळावे यासाठी माझे वडील सुरतहून वडोदरा येथे आले. त्यांनी मुलांसाठी खूप केले असे म्हणत हार्दिक भावुक झाला. त्यानंतर तो अश्रू रोखू शकला नाही. 

 

शेवटी आनंदाला अंत नाही. हार्दिकच्या चेहऱ्यावर बोलताना आनंद ओसंडून वाहत होता. तो म्हणाला की विराटची ही सर्वोत्तम खेळी आहे. तो चांगली फिनिशर आहे. आजची स्थिती अतिशय कठीण होती. त्यात तो उत्तम खेळला हीच त्याची महानता आहे. हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी संपुर्ण क्रिकेट प्रेमींना जणू दिवाळी गिफ्टच दिले असे प्रेक्षनांना 

वाटते आहे. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts