तुम्हालाही Yono SBI नावावरून असा मेसेज आलाय का ? वेळीच व्हा सावधान !

आपल्यापैकी अनेकांचे खाते SBI बँकेत असतील. त्यामुळे माहिती म्हणून कित्येकांनी YonoSBI चे ॲप देखील डाऊनलोड करून ठेवले असेल. परंतु, तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुम्ही यूनो ॲप वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुमचे एसबीआय यूनो खाते होणार बंद! खरं तर सोशल मीडियावर हा एक न्यूज मेसेज खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की जर आपण पॅन नंबर अपडेट केला नाही तर खाते बंद केले जाईल असा SMS सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

SBI Yono Scam

या व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक अपडेट केला नाही तर तुमचं खातं बंद होईल. इतकंच नाही तर यासोबतच या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, ज्यामध्ये अपडेट करा असं सांगण्यात आलं आहे. एसबीआयकडून हा मेसेज पाठवण्यात येत असल्याचा दावाही यामध्ये केला जात आहे. खरंतर हा मॅसेज युनो एस बी आय या नावाने कित्येकदा अनेकांना आला असेल. 

 

परंतु लगेच या मेसेजची पीआयबीची फॅक्ट चेकिंग टीम करण्यात आली. पीआयबी फॅक्ट चेकने याचा तपास करून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटला शेअर करत म्हटले आहे की, एसबीआयच्या नावाने जारी करण्यात आलेल्या फेक मेसेजमध्ये ग्राहकांना त्यांचे अकाउंट बंद होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा पॅन नंबर अपडेट करण्यास सांगितले जात आहे. आणि हा मॅसेज कित्येक जणांना वारंवार येत असल्याचे सिद्ध झाले आहे. 

 

खरंतर, हा व्हायरल मेसेज पूर्णपणे फेक आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “ईमेल आणि एसएमएसला कोणताही रिप्लाय देऊ नका. यासोबतच कोणतीही माहिती शेअर करू नका त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.”

 

त्यामुळे, बँकेकडूनही अशा प्रकारच्या आलेल्या मेसेजला रिप्लाय करू नका यासाठी अलर्ट दिला जात आहे. असे मेसेज फ्रॉड असून त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन बँकेनं केलं आहे. बँकेनंही आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला आहे. तुमचे कोणतेही पर्सनल डिटेल्स, CVV नंबर किंवा कार्ड डिटेल्स शेअर करू नका असं बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील Yono SBI कडून असा मॅसेज आला असेल तर त्या लिंकवर क्लिंक करू नका. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts