हिवाळ्यात प्रचंड केस गळती होतेय ? मग करा हे सोपी रामबाण उपाय !

हिवाळ्यात प्रचंड केस गळती होतेय ? मग करा हे सोपी रामबाण उपाय ! 

 

कडाक्याची थंडी म्हटली की केस गळती आली हिवाळ्यामध्ये स्त्रियांची एक प्रचंड समस्या म्हणजे केस गळती स्त्रियांचे सौंदर्य हे तिच्या केसांवर असते ज्या स्त्री चे केस लांब घनदाट आणि सरळ असतात त्या अधिकच आकर्षक दिसतात. परंतु वाढत्या केस गळतीचे प्रमाण यामुळे स्त्रिया अधिकच नैराश्यात जातांना दिसत आहेत. त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या केसांवर किती प्रेम आहे हे त्यावरून कळते त्यामुळे हिवाळ्यात वाढती केस गळती स्त्रियांची प्रचंड मोठी समस्या बनली आहे यावर उपाय अनेक आहेत परंतु काही रामबाण उपाय आपल्या कामी येत असतात असेच काही हिवाळ्यातील केस गळतीवरील उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्यातील पहिला उपाय म्हणजे,

 

घरगुती तेलाचे पॅक

 

आता घरगुती तेलाचे पॅक म्हटल्यानंतर साधे खोबरेल तेल घेऊन वाटीभर खोबरेल तेलात जास्वंदाचे फुल व कढीपत्त्याची पाने, मेथी आवळा या सगळ्या गोष्टी तेलात गरम करायचे आहे आणि तेल थंड झाल्यावर हे सर्व पदार्थ तेलातच पिळून ते तेल गाळून घ्यायचे आहे असे आयुर्वेदिक तेलाचे पॅक आपण घरच्या घरी बनवून आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना नक्कीच वापरून मसाज करून आपण आपल्या केसांची गळती थांबवू शकतो.

 

घरगुती आवळा तेल

 

जर तुम्हाला काही गोष्टींची एलर्जी असेल आणि इतर काही पदार्थ तेलामध्ये टाकलेले आवडत नसतील तर घरी बनवलेला आवळा तेल हा अत्यंत प्रभावशाली आहे. होय आवळा तेल आणि हा घरी बनवलेला आवळा तेल अनेक केसांच्या समस्या दूर करतो आता हे बनवण्यासाठी एका वाटीत खोबरेल तेल घेऊन आवळ्याच्या बारीक फोडी करायच्या आहेत त्यानंतर त्या आवळ्याच्या फोडी गरम तेलात टाकायचे आहेत आवळा जोपर्यंत लालसर येत नाही किंवा त्याचे रंग बदलत नाही तोपर्यंत त्याचे सत्व त्या तेलात पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तेल थंड झाल्यानंतर हाताने तेलात पूर्णपणे प्रेस करून घेऊन बाहेर काढून घ्यायचे आहे आणि ते तेल तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना लावू शकता.

 

लाल कांद्याचा रस

 

लाल कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. आता हे पॅक बानवल्यासाठीएक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या. आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा नक्की फायदा होईल. 

 

हीना

 

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ‘ हीना ‘ प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे. आता हे पॅक कसे बनवाल ? तर हे पॅक बनवण्यासाठी २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला. हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या. आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा. सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊन टाका. 

 

एरंडीचे तेल

 

होय !  हे एरंडीचे तेल शरीरास अत्यंत उपयुक्त आहे हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल पण ही गोष्ट होती इतकेच सत्य आहे थंडीत तुमचे जर केस प्रचंड प्रमाणात गळत असतील तर साध्या खोबरेल तेलात एरंडीचे तेल मिक्स करून आठवड्यातून दोन किंवा तीनदा मसाज करावी परंतु हे दोन्ही मिक्स केलेले तेल स्कॅल्पला पूर्णपणे लागले पाहिजे, याची काळजी घ्यावी. साधारणतः एक महिना हे मिक्स केलेले तेल तुम्ही जर केसांना लावले तर नक्कीच तुमची केस गळती खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. तेव्हा ही प्रभावशाली टीप नक्की फॉलो करा. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts