टीप-ट्रिक्स: YouTube च्या Advertising मुळे त्रस्त झाले आहत, मग ही ट्रिक नक्की वापरा !

YouTube वर मोफत व्हिडिओ पाहता येत असल्याने इतर अॅप्सच्या तुलनेत यूजर्सकडून या प्लॅटफॉर्मला पसंती दिली जाते. या अॅपवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ मोफत पाहता येतात. मात्र, जे व्हिडिओ तुम्हाला मोफत वाटतात, त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागतील. ही किंमत डेटा आणि वेळेच्या स्वरुपात असते. सोबतच, व्हिडिओ दरम्यान जाहिराती देखील दिसतात. गेल्या काही वर्षात युट्यूब व्हिडिओतील जाहिरातींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकाच व्हिडिओमध्ये दोन-तीन जाहिराती सहज येतात. अनेकदा जाहिरातींमुळे व्हिडिओ देखील व्यवस्थित पाहता येत नाही. परंतु, तुम्ही सोप्या ट्रिकद्वारे जाहिरातींशिवाय युट्यूब व्हिडिओ पाहू शकता.

हे उपाय केल्यास जाहिरातींना टाटा बायबाय:

तुम्ही थर्ड पार्टी अॅड ब्लॉकर अॅप्सचा देखील वापर करू शकता. तुम्हाला Google Play Store वरून Free Adblocker Browser: Adblock & Private Browser डाउनलोड आणि इंस्टॉल करावे लागेल. तुम्ही याप्रकारचे दुसरे अॅप देखील वापरू शकता. हे एक सिंपल ब्राउजर आहे, जे साइट्सवर दिसणाऱ्या बहुतांश अॅड्सला ब्लॉक करते. YouTube वर अॅड फ्री एक्सपीरियन्ससाठी तुम्हाला या ब्राउजरचा वापर करता येईल. तुम्ही यावर तुमच्या आवडीचे सर्च इंजिन देखील निवडू शकता. यानंतर तुम्हाला YouTube सर्च करायचे आहे व विना जाहिरातीचे YouTube Videos पाहू शकता.

YouTube जाहिरात स्किप करण्यासाठी बटन मिळत असे. परंतु, आता जाहिरात स्किप करण्यासाठी काही सेकंद वाट पाहावी लागते. YouTube वरती जाहिराती नको असल्यास तुम्हाला प्रीमियम प्लान खरेदी करावा लागतो. YouTube प्रीमियम प्लानसाठी महिन्याला १२९ रुपये खर्च करावे लागतात. तुम्हाला जर युट्यूब प्रीमियम प्लान खरेदी न करता विना जाहिरातींचे व्हिडिओ पाहायचा असेल तर अॅड ब्लॉकरची मदत घ्यावी लागेल. मोबाइल आणि कॉम्प्युटरवर क्रोम अथवा Edge ब्राउजर वापरत असाल तर अॅड ब्लॉकरचा उपयोग होईल. यासाठी तुम्हाला Adblock For YouTube एक्सटेंशन वापरावे लागेल. या एक्सटेंशनला इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही विना जाहिरातीचे युट्यूब व्हिडिओ पाहू शकता.

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts