नवरात्रीतीत पूजा ‘अशी’ करा परंतु चुकूनही करू नका हे कार्ये

नवरात्र सुरू होत असल्यामुळे देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जिकडे तिकडे जोरदार तयारी सुरू आहे. परंतू कोणतीही पूजा ही विधिवत केली की मनाला समाधान मिळते आणि आत्मिक शांतता लाभते. परंतू नवरात्री सारखा मोठा उत्सव असल्यावर काय करावे आणि काय करू नये यातच सगळं गोंधळ उडतो. आणि पूजा ही विधीवतपणे, निर्विघ्नपणे पार पडत नाही. पुजेचा क्रम चुकला की जीवाला हुरहूर लागते, त्यामुळे या नवरात्रोत्सवात पूजन करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे जर आपल्याला माहीत असेल तर निश्चितच कोणतीही पूजा निर्विघ्नपणे संपन्न होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नवरात्री उत्सवात काय करावे आणि काय करू नये तसेच घटस्थापना कशी करावी याबाबत आम्ही या महत्वपूर्ण लेखातून माहिती देणार आहोत. तर सर्वप्रथम बघुयात नवरातत्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये. 

 

१) हा एक अतिशय पवित्र सण आहे. म्हणून या नऊ दिवसांत मांसाहार करणे अल्कोहोलचे सेवन करणे टाळा. तसंच लसूण, कांदा खाणे टाळले पाहिजे.

 

२) स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळदेखील स्वच्छ करा.

 

३) पहिल्या दिवशी (प्रतिपदा तिथी) कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी.

 

४) दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा. आरती दोन्ही वेळा करा.

 

५) दुर्गा सप्तशतीचे पठण करा, माते दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा.

 

६)  जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा.

 

७) नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.

 

८) नवरात्रीत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. तसेच या दिवसांत अन्नदानकरणाऱ्यांना विषेश महत्व आहे.

 

९) घरी आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षेसाठी आलेल्या व्यक्तीला आदराने अन्न अर्पण करावं. यामुळे माता भगवती प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते.

 

१०) उपवास करणाऱ्या व्यक्तीने चामड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत.

 

११) नवरात्रीच्या काळात पूजेसाठी देवीच्या भंग झालेल्या मूर्तीचा वापर करू नये.

 

१२) नवरात्रीत नऊ बालीकांना जेवणास बोलावून त्यांना शृगार वस्तू दान केल्यास विशेष कृपा प्राप्त होते.

 

नवरात्र घटस्थापनेचे साहित्य –

 

घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या, पूजेसाठी जल, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान इत्यादी साहित्यांचा वापर होतो.

 

नवरात्र घटस्थापना पूजा विधी – 

 

दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा. यानंतर मातीवर कलश ठेवावा. अक्षता, फूल आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न टाकावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी एकत्र मिसळावे. आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशाला कुंकूवाच्या रंगाने सजवू शकता. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा. कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे. यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. महादेव शिवशंकर आणि ब्रह्मदेवांचे स्मरण करावे. यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती पठण करावी. दुर्गा सप्तशती तीन भागात विभागले असून, पठण करताना एका चरित्राचे करावे.

 

घटस्थापनेचा मंत्र – 

 

घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम हात जोडून देवीचे स्मरण करावे. संपूर्ण पूजा साहित्य व्यवस्थीत ठेवेपर्यंत मंत्रोच्चार सुरू ( Ghatasthana Mantra ) ठेवावा. ‘ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥’, असा मंत्र म्हणावा. हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षत, फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा.

 

शारदीय नवरात्र संकल्प मंत्र – 

 

घटस्थापनेवेळी भाविक अनेक मंत्रांचा उच्चार करू ( Sharadiya Navratri Sankalp Mantra ) शकतात. यात ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु:, ॐ अद्य ब्रह्मणोऽह्नि द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे पुण्य (आपल्या क्षेत्राचे वा भागाचे नाव घ्यावे) क्षेत्रे बौद्धावतारे वीर विक्रमादित्यनृपते: २०७७, तमेऽब्दे शार्वरी नाम संवत्सरे सूर्य उत्तरायणे शरद ऋतो महामंगल्यप्रदे मासानां मासोत्तमे आश्विन मासे शुक्ल पक्षे प्रतिपदायां तिथौ शनि वासरे (गोत्राचे नाव घ्यावे) गोत्रोत्पन्नोऽहं अमुकनामा (स्वतःचे नाव घ्यावे) सकलपापक्षयपूर्वकं सर्वारिष्ट शांतिनिमित्तं सर्वमंगलकामनया- श्रुतिस्मृत्योक्तफलप्राप्त्यर्थं मनेप्सित कार्य सिद्धयर्थं श्री दुर्गा पूजनं च महं करिष्ये। तत्पूर्वागंत्वेन निर्विघ्नतापूर्वक कार्य सिद्धयर्थं यथामिलितोपचारे गणपति पूजनं करिष्ये। ‘यथोपलब्धपूजनसामग्रीभिः कार्य सिद्धयर्थं कलशाधिष्ठित देवता सहित, शारदीय नवरात्र श्री दुर्गा पूजनं महं करिष्ये। या मंत्रांचा जप तुम्ही करू शकता. अश्याप्रकारे तुम्ही घटस्थापना करून पूर्ण नऊ दिवस या नवरात्रीतील नऊ अलौकिक शक्तींचे स्मरण करू शकता.  

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts