‘गूगल-पे’ वरून कॅशबॅक मिळत नाही ? करा ‘या’ सोप्या ट्रिक्स फॉलो. लगेच पैसे मिळतील.

अनेकदा गुगल पे ॲप डाऊनलोड केल्यानंतर पहिल्यांदाच आपण कुणाला पैसे पाठवल्यास आपल्याला कॅशबॅक मिळते परंतु त्यानंतर अनेक देवाणघेवाण केल्यास कॅशबॅक भरपूर जणांना मिळत नाही परंतू आता काळजी करू नका. कारण यासाठी आम्ही आज तुम्हाला सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गुगल पेमेंटचा बोलबाला आहे. जीपे सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. सुरुवातील पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक मिळत होतं. मात्र आता तितकं कॅशबॅक मिळत नाही. तुम्हालाही कॅशबॅक मिळत नसेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या माध्यमातून तुम्ही कॅशबॅकसह कुपन्स आणि ऑफर्स मिळवू शकता. गुगल पेमेंट अ‍ॅपवर विजिट केल्यानंतर काही प्लान पाहायला मिळतात. गुगल पेमेंटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत काही ऑफर्स आहेत. जर तुम्ही योग्य प्लान निवडला तर चांगला कॅशबॅक मिळू शकतो. गॅस बिल, वीज बिल, पेट्रोल बिल भरल्यानंतर तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळू शकतो. जर तुम्हाला चांगल्या कॅशबॅकची अपेक्षा असेल तर ही ट्रिकचा अवलंब कराल. चला तर बघूयात या सोप्या ट्रिक्स. 

 

जर तुम्ही एकाच खात्यावर मोठी रक्कम पाठवली आणि तुम्हाला मोठा कॅशबॅक मिळेल असे वाटत असेल, तर तसे नाही. तुम्हाला कॅशबॅक हवा असेल तर वेगवेगळ्या खात्यांवर पेमेंट करा. यामुळे जास्त कॅशबॅक मिळेल आणि त्याची शक्यताही जास्त असेल.

 

मोठी रक्कम ट्रान्सफर करू नका

 

तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम ट्रान्सफर करू नका. कारण गुगल पेमेंटवर जास्तीच कॅशबॅक मिळणार नाही. तीच रक्कम तुम्ही वेगवेगळ्या अकाउंटवर ट्रान्सफर कराल तर कॅशबॅक मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.

 

कुपन खरेदी करा

 

Google Payment करताना एक गोष्ट लक्षात ठेवा वर कूपन पाहिले असतील, जर तुम्हाला चांगल्या कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल. तर ही कूपन नक्कीच खरेदी करा आणि मग तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळेल आणि तुम्ही हजारो कमवू शकाल.

 

पेमेंट दोन ते तीनदा करा 

 

Google Payment करताना एकाच वेळी खूप मोठे पेमेंट पाठवण्याऐवजी ते पेमेंट दोन ते तीन वेळा पाठवा. असे केल्याने कॅश-बॅक रिवॉर्ड मिळण्याची शक्यता जास्त आहे. 

 

जास्त गूगल पे चा वापर करा

 

होय ! तुम्ही ऑफलाईन पेमेंट करण्यापेक्षा नेहमी आणि वेगवेगळ्या दिसातून भरपूरवेळा ऑनलाइन गूगल पे द्वारे पेमेंट करत असाल तर तुम्हाला यातून देखील रेवार्ड सोबत कॅशबॅक मिळू शकते.

 

नव्याने गूगल पे इंस्टॉल केल्यास 

 

जर तुम्ही गूगल पे इंस्टॉल करण्याचा विचार करत असाल तर आधिकृत ॲप डाऊनलोड करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला आधी काही रुपये पाठवून बघा. तुम्हाला नक्की कॅश बॅक मिळण्याची शक्यता आहे.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts