निर्माल्य पासून बनवा घरच्या घरी सेंद्रिय खत.

गौरी गणपती म्हटल्यावर रोजच्या पूजेचे निर्माल्य हे जमा होणारच. पण जर तुम्हाला बागकाम करायची आवड असेल आणि या निर्माल्य पासून जर आपल्याला घरच्या घरी उत्तम प्रतीचा कंपोस्ट खत तयार करता आले तर ? किती फायदा होईल ना ? शिवाय झाडांना फळं फुलं भरपुर येतील आणि मुख्य म्हणजे या निर्माल्य पासून सार्वजनिक ठिकाणी कचरा देखील होणार नाही. मग आहे ना भन्नाट आयडिया ? खरंतर वेळ, पैसे वाचविणाऱ्या या पर्यायातून घराच्या बागेतल्या झाडांना नवसंजीवनीही आपण देऊ शकतो. आणि असेच विविध प्रयोग पर्यावरणप्रेमींकडून झाले तर फारच बरं होईल. 

 

खरंतर अगदी फ्री मध्ये चांगल्या गुणवत्तेचे खत आपण घरच्या घरी उत्तमरित्या बनवून शकतो. हे निर्माल्य म्हणजे श्री. गणेशाचे पूजन केल्यानंतर दुर्वा, जास्वंदी, हे झेंडूची फुले, हार, खाऊचे पान यासह इतर वनस्पतींचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होते. विसर्जनादिवशी निर्माल्य दान करतात. या निर्माल्यापासून महापालिकेतर्फे खतनिर्मिती केली जाते. या निर्माल्यावर घरच्या घरी प्रक्रिया करता येऊ शकते. या प्रयोगाची बहुतेकांना माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात हे सेंद्रीय खत कसे करायचे, याची माहिती उपलब्ध होत नाही. अशाच निर्माल्यापासून खतनिर्मितीचे मौल्यवान कार्य आपणदेखील करू शकतो. पण निर्माल्य पासून खतनिर्मिती नेमकी कशी करायची ते आता आपण जाणून घेऊयात.

 

असे तयार करा खत

 

प्लािस्टकची कुंडी, रंगाचा डबा किंवा मातीच्या कुंडीला छिद्र पाडायचे. कुंडीत सुरवातीला विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या घालायच्या. त्यावर  वाळलेली पाने घालायची. त्याचा एक थर दिल्यानंतर गणेशोत्सवात साठलेल्या निर्माल्याचा एक थर द्या. हे निर्माल्य घालण्यापूर्वी ते वेगवेगळे करून घ्या. उदा. फुलांच्या पाकळ्या काढून घ्या. या थरानंतर मातीचा एक थर द्या. त्यानंतर पुन्हा निर्माल्याचा थर द्यायचा. जोपर्यंत निर्माल्य संपत नाही तोपर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी. कुंडीत हे घालून झाल्यानंतर थोडेसे पाणी शिंपडावे. त्यानंतर ही कुंडी झाकून ठेवा. फक्त आठ ते पंधरा दिवसांनंतर हे मिश्रण हलवायचे. मिश्रण काळपट पडल्यावर त्याचा बारीक चुरा करून घ्यावा. नंतर मात्रेनुसार थोडे थोडे करून झाडाच्या भोवताल टाकावे

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts