कोरोनाची लस हवी आहे, तर जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत.

मागील वर्षी आलेला कोरोना आजही आपली पाठ सोडायला तयार नाही. त्यातच आता कोरोना ने आपले जनुकीय रूपही बदलले आहे. कोरोना मृत्यूचे तांडव आपण पाहतच आहोत. त्यातही वृध्द लोकांना कोरोनामुळे अनेक त्रास होत आहे. त्यातही लसींचा अपुरा पुरवठा, भारतातील’ प्रशासकीय रांग लावा व्यवस्था’ यामुळे वृध्द आणि गरीब जनते त्रासून गेली आहे. म्हणून जाणून घेऊया कोरोना लसीच्या ऑनलाईन नोंदणी करणे बद्दल.

१. स्वत: नोंदणी करणे:

‘कोविन २.०’ किंवा आरोग्य सेतू पोर्टलवरून किंवा अॅप डाउनलोड करून लसीकरणासाठी स्वतः नोंदणी करता येणार आहे. एका मोबाइल क्रमांकावरून चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. ‘ओटीपी व्हेरिफिकेशन’नंतर लाभार्थ्याचे कोविन अकाउंट उघडण्यात येणार असून, त्यावर नाव, जन्माचे वर्ष, लिंग आदी तपशील भरावा लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जवळचे सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र, तारीख व वेळ निवडता येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्लिपची प्रिंट काढता येणार आहे; तसेच लाभार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेज देण्यात येणार आहे.

२. ‘कोविन अॅप २.०’ ॲप वापरून नोंदणी :

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसरा टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त (को-मॉर्बिड) व्यक्ती आणि ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी ‘कोविन अॅप २.०’ हे नवीन व्हर्जन लाँच केले जाणार आहे. लस घेण्यासाठी इच्छुकांना या अॅपवर स्वतः नोंदणी (सेल्फ रजिस्ट्रेशन) करता येणार आहे. अॅपवर नोंदणी करणे शक्य नसल्यास जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे.

३.केंद्रांवर नोंदणी:

ऑनलाईन किव्हा ॲप नोंदणी शक्य नसल्यास जवळच्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी (ऑन साइट रजिस्ट्रेशन) करता येणार आहे. त्याचे वेळापत्रक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. लाभार्थी आपल्या सोयीने लसीकरणाचा स्लॉट निवडू शकतो. नोंदणी झाल्यानंतर केंद्रावर लस उपलब्ध असल्यास ती लगेच घेता येईल.

नोंदणी झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर मोफत; तर केंद्राच्या आरोग्य योजना (सीजीएचएस), आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयात सशुल्क लस घेता येणार आहे


नोंदणी व लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे:
– आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
– वयाचा पुरावा आणि छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र
– ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्तींना (को-मॉर्बिड) नोंदणीकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागणार असून, त्याचा नमुना केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना व्याधीग्रस्त व्यक्तींना आजाराची माहिती द्यावी लागणार आहे.

कोरोना लस कधी मिळते कधी संपते, कधी इंटरनेट च्या त्रुटींमुळे तुम्हाला पुढच्या दिवसात सुद्धा बोलावले जाऊ शकते. म्हणून खूप वेळ आणि थंड डोक ठेऊनच कोरोना लसी करण्यासाठी जा.किव्हा आपल्या निवडून दिलेल्या नेत्यांना सांगून घरोघरी लसीकरण ही मोहीम सुरू करण्याचा सल्ला द्या.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts