हिवाळा म्हटलं की त्वचा की काळी पडतेच. मग काहीही क्रीम वापरल्यास ते त्वरित रिझल्ट तर देतात परंतु स्क्रीम लावणं बंद केल्यास जैसे थे परिस्थिती दिसते. अनेकजण त्वचेवरील मळ निघण्यासाठी कित्येकजण त्वचेला घासून काढतात. हे फारच चुकीचे आहे. यामुळे त्वचा रुक्ष होऊ शकते. कधी कधी कुठे बाहेर जातांना मेकअप केला की चेहरा गोरे आणि हात मात्र कले दिसतात. हा अनुभव जवळपास अनेकांना आला असेल. आपले हातही जर गोरे दिसत असतील तर एक वेगळाच लूक शरीराला मिळतो. हात काळे दिसत असतील तर अर्ध्या हातावरचे स्लिवस् पण खूप खराब दिसतात. ते काळया हातावर शोभून दिसत नाही. मग काळे हात गोरे करण्यासाठीं आमच्याकडे खास तुमच्यासाठी खास टिप्स आहेत. हा उपाय फक्तं स्त्रियाच नाही तर पुरुष मंडळी देखील करू शकता. मग चला तर बघुयात हात गोरे करण्यासाठीं घरगुती टिप्स. ते ही जास्त पैसे खर्च न करता. यातील पहिला उपाय आहे,
How to remove black hand skin tone color?
१. सनस्क्रीनचा वापर
घराच्या बाहेर पडताना सनस्क्रीन लोशनचा वापर करणे अतिशय आवश्यक असते. जर तुम्ही जास्त वेळासाठी बाहेर असाल तर दर २ तासांनी हे सनस्क्रीन हाताला लावायला हवे. गाडी चालवताना हात पातळ अशा ग्लोव्हजनी कव्हर करायला हवेत. तुमच्या त्वचेला सूट होणारे असे कोणतेही सनस्कीन तुम्ही वापरु शकता.
२. ग्लिसरीनचा वापर
हिवाळ्यात त्वचा संपूर्ण काळी पडते. कितीही त्वचेची काळजी घेतली तरीही जैसे थे ही परिस्थिती होऊन पुन्हा त्वचा काळवंडली जाते. यातच आपले हात हे चेहऱ्याच्या तुलनेत थोडे काळे दिसत असतात. त्यामुळे हे समांतर रंग दिसण्यासाठी तुम्ही रोज झोपण्या अगोदर ग्लिसरीनचा उपयोग करू शकता. ग्लिसरीन घेऊन संपूर्ण हाताला. हाताच्या कोपर्यापर्यंत मालिश करून ते सोडून द्यायचे आहे. हा उपाय केल्यास तुमचे हात नक्की गोरे होतील.
३) लिंबुचा वापर
हिवाळ्यात जर तुमचे हात काळे पडत असतील तर यासाठी रामबाण उपाय म्हणजे पिकलेल्या लिंबूचे दोन काप करून दोन्ही हाताला ५ मिनिटे हळुवारपणे घासून घ्यायचे आहे. यामुळे तुमच्या काळवंडलेल्या हातावरची परत नाही होईल हा एक प्रकारचा लिंबू स्क्रब आहे त्यामुळे हा उपाय जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस करत असाल तर नक्कीच तुमच्या त्याचे रंग उजळलेला दिसेल
४) कोमट पाणी
हिवाळ्यात तुम्ही गरम पाणी अंघोळीसाठी नेहमीच वापरत असाल. यात जर का तुम्ही दोन थेंब ग्लिसरीन टाकून अंघोळ केल्यास किंवा गरम-कोमट पाण्यात १० ये १५ मिनिटे रोज टाकून हलक्या हाताने स्क्रब केल्यास हात काळपट दिसणार नाही.
५). मॉईश्चरायजिंग
ही अतिशय महत्त्वाची स्टेप असून त्वचा चांगली ठेवायची तर मॉईश्चराजरचा वापर अवश्य करायला हवा. शक्यतो थोडे जाडसर मॉईश्चरायजर निवडावे, म्हणजे ते जास्त काळ त्वचेवर राहण्यास मदत होते. यामध्ये शिया बटर, कोको बटर, युरीया, लॅक्टीक अँसिड, ग्लिसरीन असे घटक असतील तर कोरड्या त्वचेसाठी ते फायदेशीर ठरते.
६) क्रीम
त्वचा एक्सफॉलिएशन करणारी क्रिम्स वापरावीत. आठवड्यातून एकदा अशाप्रकारच्या क्रिम्सचा वापर करावा. एक्सफॉलिएशन केल्यानंतर २ ते ३ दिवस सूर्याच्या किरणांचा त्वचेशी थेट संबंध येणार नाही अशी काळजी घ्यावी. पण तुम्हाला एक्झिमा किंवा सोरायसिस असेल तर अशी क्रिम शक्यतो वापरु नयेत.