लग्नातील गर्दीमुळे कलेक्टर भडकले, नवरदेवाला लाठी वापरून थांबविले लग्न, नंतर मागितली माफी.

सैलेश कुमार यादव हे त्रिपुरतील कलेक्टर, लग्नात लोकांची तोबा गर्दी पाहून भडकले, इतक्यावर थांबतील ते कलेक्टर साहेब कसे चक्क नवरदेवाला दांडुक्याचे पटके देऊ करून लग्न थांबविले. सुशिक्षित आणि श्रीमंत लोक कसा पैशांचा दुरुपयोग करतात हे सुध्दा सांगू लागले.वरच्या आईने दाखवलेले लग्नाची परमिशन असणारे कागदही सिने स्टाईल फाडून टाकले.

प्रशासकीय अधिकारी लोकांची समजूत घालवून त्यांच्या चुका लक्षात आणून देणे फार चांगले काम असते. लोकही नम्रतेने आपली चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु अश्या हीटलरशाही मुळे लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणे बरे वाटत नाही. त्यातच कलेक्टर साहेबांच्या ऑर्डर वरून ३० जणांना पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि दोन लग्न सभागृहाचे तत्काळ टाळे ठोकण्याचा प्रकार घडला.
परंतु जेव्हा हा प्रकार काही आमदारांनी, मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिला तेव्हा. कलेक्टर साहेबांनी माफी मागितली.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts