बाजारातनवनवीन फोन आलेत की आपण ते लगेच खरेदी करतो. काही दिवस फोन चांगला चालतो परंतु हळू हळू तो काम करायला लागतो. कोणत्याही बाबतीत गती कमी झालेली दिसते. मग यावर उपाय काय ? कधी तर स्मार्टफोन नीट चार्ज केला नाही तरी तुमच्या स्मार्टफोनचे लाईफ कमी होऊ शकते. कोणत्याही चार्जरने स्मार्टफोन चार्ज करू नका. जेव्हा तुम्ही कमी किंवा जास्त पॉवरच्या चार्जरने स्मार्ट फोन चार्ज करता तेव्हा बॅटरी फुटण्याची भीती तर असतेच.पण, चार्जिंगचा वेगही मंदावतो. म्हणून याकडे लक्ष द्या.
गेम्स ॲप्स डिलीट करा:
स्मार्टफोन वर्षानुवर्षे चांगल्या स्थितीत राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधून हेवी गेम्स डिलीट करा. कारण, यामुळे प्रोसेसरवर खूप दबाव येतो आणि स्मार्टफोनचे लाईफ कमी होते.
अपडेटेशनचा मेसेज आल्यास
वेळोवेळी पूर्ण करा. कारण यामध्ये काहीवेळा बग पॅचेस असतात, जे स्मार्टफोनमधील कोणताही चुकीचा प्रोग्राम दुरुस्त करतात. तसंच नवीन वैशिष्ट्यंदेखील उपलब्ध करतात.
अनावश्यक Apps
तुमच्या स्मार्टफोनमध्ये कमी किंवा अजिबात वापरात नसलेले अॅप्सअसल्यास, ते तात्काळ डिलीट करा. हे अॅप्स फक्त तुमच्या स्मार्टफोनची जागा व्यापतात. यामुळे स्मार्टफोनचा वेग कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्मार्टफोनमध्ये तेच अॅप्स ठेवा जे तुमच्या वापरात आहेत.
ओव्हर चार्ज
कधी कधी आपण पूर्ण चार्गिंगचा वापर करतो. आणि नंतर बॅटरी लो झाल्यास चार्जिंगला लावतो. आणि काही लोक त्या वेळेत इतर कामं करत असतात. परंतु काही लोक मोबाईल चार्जिंगवर लावलेला आहे हेच मुळात विसरून जातात. शिवाय चार्जिंगही फारकाळ मोबाईललला लाऊन ठेवतात. त्यामुळे कधी मोबाईल गरम येतो. तुमचा मोबाईल फास्ट चालावा असं तुम्हाला वाटतं असेल तर मोबाईल कृपया ओव्हर चार्ज करू नका.
आणि सर्वात महत्वाची सूचना म्हणजे, तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनमध्ये कोणतेही ॲप डाउनलोड करत असाल तर फक्त Google Play Store वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही अनधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केले तर स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता असते. तसेच, काही युजर्स स्मार्टफोनच्या Background Apps चालू ठेवतात. तुम्हीही हे करत असाल तर करू नका. यामुळे इंटरनेटवर खूप खर्च होतो. यासह, प्रोसेसरवर दबाव येतो. ज्यामुळे त्याचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे वरील टिप्स सांगितल्या प्रमाणे तुम्ही देखिल हे करून बघा. नक्की फायदा होईल.