स्मरणशक्ति वाढविण्यासाठी ‘हे’ करा जालीम उपाय

आपली स्मरणशक्ती कमकुवत तर होत नाहीये ? असा प्रश्न मात्र सर्वांनाच पडत असतो. हजारों रुपयांच्या गोळ्या औषधांचे सेवन करून सुध्दा आपला विसरभोलेळेपणा वाढत जातो. परंतू यावर उपाय म्हणुन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बाजारात विविध प्रकारची औषधे उपलब्ध देखील आहेत. परंतु या औषधांचे सेवन करण्यापेक्षा काही घरगुती उपायांस्मरणशक्तीनी तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता. मग चला तर जाणुन घेऊयात आजच्या लेखातील उपयुक्त गोष्ट.

 

प्राणायाम करा 

अनेक योग गुरू, अभ्यासक सांगतात की, प्राणायाम केल्यानं शरीरावरील ताण कमी होतो. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं, ज्यामुळे मेंदूच्या स्नायूंना मजबुती मिळते. स्मरणशक्ती चांगली होते आणि विसरण्याच्या समस्येवर मात केली जाते. शिवाय शरीराच्या इतर समस्यादेखील दूर होतात. त्यामुळे आपला मेंदू हा शांत स्थितीत असल्यास विसरभोळेपणा कमी होईल.

 

पुरेशी झोप घ्या 

Image Credit : iStock

केवळ मेंदूसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील झोपेची खूप आवश्यकता असते. परिपूर्ण झोपेमुळे शरीराची झीज आणि कमतरता भरून निघते. व्यस्त जीवनशैलीमुळे बर्‍याच लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही यामुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतो, म्हणून भरपूर झोपे घ्या आणि निरोगी व्हा.

 

उपयुक्त फिश ऑइल

Image Credit : iStock

 

फिश ऑइल म्हणजेच माशांपासून तयार होणारं तेलदेखील स्मृती वाढवण्यात मदत करतं. फिश ऑइलमध्ये ओमेगा -3 फॅटी, अँसिड इकोसापेंटेनिक अँसिड आणि डोकोहेक्सॅनोइक अँसिड असतं. या सर्व गोष्टी मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. फिश ऑइल वृद्धांची स्मृती देखील सुधारू शकतं.

 

आयुर्वेदिक ब्राम्ही

Image credit : iStock

स्मृती आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी ब्राह्मी हे एक चांगले आयुर्वेदिक औषध आहे. ब्राह्मीमध्ये सिटगॅमेस्टेरॉल आणि बॅकोसाइडसारखे घटक असतात, जे मेंदूचं कार्य वाढवण्यात मदत करतात. बरेच लोक तणाव कमी करण्यासाठी ब्राह्मी तेलानं मालिश करतात. ब्राह्मी तेल केसांना दाट आणि मजबूतदेखील बनवतं.

 

नियमित शंखपुष्पीचे सेवन 

 

अनेक सल्लागार सांगतात की, शंखपुष्पीचा वापर ताणतणावसारख्या समस्या दूर करतं. त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारतं. शंखपुष्पीचं सेवन करून निद्रानाश आणि थकवा लगेच घालवता येतो.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts