आशिया कप २०२२: भारतीय संघ आशिया कप मधून बाहेर पडण्याची प्रमुख कारणे ही आहेत.

दुबई येथे  खेळल्या गेलेल्या १५ व्या आशिया कप २०२२ मध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. 

सुपर ४ टप्यात खेळल्या गेलेल्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ आशिया कप विजेता होण्याचे स्वप्न  धुडीस मिळाले. 

 

आशिया कप २०२२ मधील भारतीय संघाची सुरवात चांगली झाली. साखळी सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमने – सामने आले असता. 

भारतीय संघाने पाकिस्तानला ५ विकेट राखून पराभव करत मागील वर्षी झालेल्या टी २० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला.

 

त्यानंतर झालेल्या साखळी सामन्यातील भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्यात सुद्धा भारतीय संघाने नवख्या हाँगकाँग संघाला ४० धावांनी मात देत 

अ – गटात अव्वल स्थानासह आशिया कपच्या पुढील टप्यात सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला. 

 

आशिया कप सुपर ४ मध्ये अफगाणिस्तान,पाकिस्तान , श्रीलंका, आणि भारत हे संघ पात्र झाले होते. त्याच बरोबर बांगलादेश  आणि 

हाँगकाँग संघाचे आशिया कप मधील आव्हान साखळी सामन्यातच संपुष्टात आले होते. 

 

आशिया कप २०२२ मध्ये सुपर ४ च्या महत्वाच्या टप्यामध्ये भारतीय संघ दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत होत. स्पर्धेतून बाद झाला. या मध्ये 

सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तान कडून पराभवाला समोर जावे लागले.

 

तर श्रीलंकेविरुद्धच्या  “करो या मरो ” सामन्यात सुद्धा भारतीय संघ पराभूत झाला.     

 

लागोपाठ दोन्ही सामन्यातील पराभवामुळे अखेर आशिया स्पर्धेतील भारतीय संघाच्या आशा गुंडाळल्या गेल्या. तर जाणून घेऊया आशिया कप मधील भारतीय 

संघाच्या पराभवाची कारणे. 

१. संघात वेगवान गोलंदाजाचा अभाव. 

 

  भारतीय संघाच्या निवड झालेल्या अंतिम १५ मध्ये केवळ तीन गोलंदाज होते. आवेश खानच्या दुखापतीनंतर केवळ दोनच वेगवान गोलंदाज उरले. 

 तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्या चा समावेश होता. साखळी सामन्यातील पाकिस्तान विरुद्धचा पराक्रम सोडला. तर सुपर ४ च्या सामन्यात 

हार्दिक पांड्या अपयशी ठरला. 

 

२. अंतिम ११ निवडी मध्ये चूक. 

 

  साखळी सामन्यातील विजयानंतर सुपर ४ मधील महत्वाच्या सामन्यात अनुभवी आणि लय मध्ये असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंत हा अनावश्यक 

  बद्दल म्हणता येईल. कारण पंत हा दोन्ही सामन्यात अपयशी ठरला. 

 

३. मधल्या फळीतील फलंदाजाची कामगिरी निराशाजनक. 

    सुपर ४ च्या महत्वाच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज रिषभ पंत, दीपक हुडा ,हार्दिक पांड्या यांना साजेशी खेळी करता आली नाही. 

 

४. मोक्याच्या क्षणी वाईट क्षेत्ररक्षण.

 

     पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंग ने सोपा झेल सोडला. तर रिषभ पंत ने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात. धावबाद करण्याची संधी चुकवली. 

 

५. नवनवीन प्रयोग.

 

 फलंदाजी क्रमवारीत सतत होणारे बदल हे मुख्य कारण असू शकते. या मुळे खेळाळू मुख्य भूमिकेपासून दुरावतो. फलंदाजी विस्कळीत होते. 

Harshal Meshram:
Recent Posts