टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती आणि त्यात राहुल द्रविड चे नाव पुढे होते. टीम इंडियाचा माजी दिग्दज खेळाडू राहुल द्रविड हा नवा प्रशिक्षक होणाच्या चर्चेला BCCI ने पूर्णविराम दिला असून राहुल द्रविड ची नियुक्ती केली. BCCI ट्विट करून अधिकृतरित्या घोषणा केली.
कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार होते. भारतीय संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार होता. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच अश्या अनेक पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती.
रवी शास्त्रीनंतर माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला हेड कोच संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती तशी क्रिकेट BCCI च्या सिलेक्शन कमिटी ची तशी इच्छा होती परंतु राहुल द्रविड ने सुरवातीस कोच होण्यास फारसा रस दाखवलेला नव्हता मात्र आता BCCI ने ट्विट करून राहुल द्रविड याची मुख्य प्रशिक्षक पदासाठी घोषणा केली. BCCI ने राहुल द्रविड ला मनवले अशे दिसते.
द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. त्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आणि मग तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशा मागणीने होऊ लागली .पण राहुल द्रविड हा National Cricket Academy प्रमुख या पदावर असल्याने तो ही संधी स्वीकारायला तयार नव्हता , पण नंतर BCCI ने राहुल द्रविड ला मनवत प्रशिक्षक पदासाठी अर्ज भरायला लावला. काही दिवसांपूर्वी राहुल द्रविड ने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दिला आणि आता त्याची नियुक्तीही झाली आहे त्यामुळे National Cricket Academy चा प्रमुख म्हणून व्हिव्हिएस लक्ष्मण याची नियुक्ती होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
सौरभ गांगुली नंतर राहुल द्रविड हा भारतीय संघचा कर्णधार होता त्यानी कर्णधार व आधी उप-कर्णधार हे दोन्ही जबाबदारी बजावली पण 2007 च्या विश्वचषकानंतर त्याने कर्णधारपद सोडले, राहुल द्राविड ला अंडर- 19 क्रिकेट टीम चा हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यात त्याने नव्या खेळाडूनां मार्गदशन केलें आणि अंडर -19 विषवचकही जिकून दिला. राहुल द्रविड च्या नावावर 36 टेस्ट शतक आणि 12 वन-डे शतक आहे भारतीय संघात असताना त्याने चांगली कामगिरी केली असून “The Wall ” म्हणून त्याला जगभरात ओळखले जाते त्यामुळे भारतीय संघाला राहुल द्रविडच्या अनुभवाचा फायदा होईल.