पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या टिप्पणीमुळे ‘या’ ,अभिनेत्रीला बिकीनी वापरणे झाले कठीण.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या बिकिनी विषयी केलेल्या टिप्पणी मुळे, एका पाकिस्तानी अभिनेत्रीची मोठी फजिती होऊन गेली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल साईदा इम्तियाज ला सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. साईदाने सोशल मीडिया बिकीनीमधील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. लोक तिला धर्माचा दाखला देवून वाईट बोलत आहेत. साईदाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बायोपिकमध्ये अभिनय केला आहे.


तर जाणून घेवू साईदा इम्तियाज कोण आहे.

सईदा इम्तियाज ही पाकिस्तानी-काश्मिरी वंशाची आहे पण तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. सईदाचा जन्म २४ मे १९९० रोजी यूएईमधील अबुधाबी शहरात झाला होता. साईदा मिळून एकून 8 भावंड आहेत. साईदाकडे फक्त अभिनयाचं कौशल्यानसून ती उच्च शिक्षित आहे. साईदाने न्यूयॉर्क यूनिवर्सिटीमधून सायकॉलजी और सोशियॉलजीचं शिक्षण घेतलं आहे.

साईदाने वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे २०१३ साली मॉडलींग क्षेत्रात पदार्पण केलं. मॉडलींगपूरता फक्त मर्यादित न राहाता तिने अभिनयाकडे देखील स्वतःचा मोर्चा वळवला. पण तिला अभिनयात हवं तसं यश मिळलं नाही. पण ती खचली नाही. सईदा इम्तियाजने २०२१ साली पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या बायोपिक ‘कप्तान: द मेकिंग ऑफ ए लेजेंड’ मध्येही काम केले होते.

चित्रपटात साईदाने इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांची व्यक्तीरेखा साकारली होती. साईताने ‘कप्तान’ चित्रपटाशिवाय ‘वजूद’ आणि ‘थोड़ी सेटिंग थोड़ा प्यार’ चित्रपटात देखील काम केलं आहे. सईदा इम्तियाज कदाचित चित्रपटांमध्ये फारशी यशस्वी ठरली नाही, पण ती सोशल मीडियावर मात्र लोकप्रिय आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts