आता विद्यार्थ्याने कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण (ITI Education) पूर्ण केले असेल तर पोलिटेक्निकच्या (Direct Second year Engineering Admission) दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी दिली.
पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असणार आहेत. पोलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी गेल्यावर्षी करोनामुळे कमी करण्यात आली होती. यंदा मात्र एक फेरी वाढविण्यात येणार असून तंत्रशिक्षण विभागाकडून यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. तसेच पोलटेक्निकमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण चांगली टेक्नॉंलॉजी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मातृछत्र आणि पितृछत्र हरवालेल्या विद्यार्थ्यांना २६० पोलटेक्निक कॉलेजमध्ये २ जागा राखीव असणार आहेत. तसेच काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्याचा निर्णय अडीच वर्षांपुर्वीच महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच दिल्लीतील जुने महाराष्ट्र युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्याचा निर्णय शिक्षणविभागाने घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीत दुसऱ्या कोणाच्या आश्रयाची गरज नसेल असेही ते म्हणाले.