आपल्या देशातील लोक नवनवे प्रयोग करून आपले डोके किती सुपीक आहेत हे वारंवार दाखवून देतात.त्यातच उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशभरात सर्वत्रच दिसून येतोय. अनेक ठिकाणी तापमान आता ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं आपण ऐकलं असेल. ओडिसा हे राज्यही त्याला काही अपवाद नाही. ओडिसातही तापमान आता ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलंय आणि इतकंच नाही, तर उन्हाच्या झळाही इतक्या बसतायत की लोक स्टोव्हशिवाय स्वयंपाकही करू शकतायत.
एका ट्विटर वापरकर्त्यांने एक व्हिडिओ शेअर केला आहे.“माझ्या गावातील सोनपूरचे दृश्य. त्या ठिकाणी इतकी गरमी आहे की गाडीच्या बॉनेटवर चपातीही तयार करता येतेय.” असं त्यांनी लिहिलं आहे. यापूर्वीही असे काही उन्हाळी स्वयंपाक कलेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
भर उन्हात ओडीसा राज्यतील सोनपूर येथील एक महिला कारच्या बोनेटवर चपाती भाजतानाची घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक महिला ४० अंश सेल्सिअसच्या गरमीत कारच्या बॉनेटवर चपाती भाजताना दिसतेय.