अहिंसा परमो धर्म: शाकाहार उत्तम आहार, जियो और जिने दो.. असे अनेक ब्रीद आपण ऐकत असाल तर नवल नाही की ते ब्रीद देणारे जैन असतील. जैन धर्मातील सध्या सुरू असलेले आयमबील ओली या व्रता बाबत जाणून घेऊया..
जैन धर्म
कर्म हेच देव. ज्यांनी इंद्रियांच्या वासनावर विजय मिळवला ते पुनात्म। म्हणजे च जीन, म्हणून या इंद्रिय वासनेवर विजय मिळवलेल्यां पुनात्मना मानणारे लोक म्हणजे जैन .जगातील पालनास अत्यंत कडक धर्म. नियम अतिशय क्लिष्ट. आणि प्रत्येकात वैज्ञानिक करण असा हा जैन धर्म . या धर्मात 2 पंथ आणि 24 तीर्थंकर.
कोणत्याही गोष्टी तुन कुणालाही त्रास होणार नाही मग मन , विचार, वाचा आणि क्रिया याचा आधार घेण्यास मागेपुढे पाहणे नाही. हा जैन धर्मचा थोडक्यात परिचय.
आयमबील ओली
हे जैन धर्मातील एक व्रत आहे. यात उपवास असतो. या उपवसामुळे मन , वाचा, क्रिया आणि कार्य शुद्ध होते . असा जैन धर्मियांचा विश्वास . यात सूर्योदय पूर्वी ते सूर्यास्त पर्यंत नियम असतात. जेवण एक वेळेस ते सुद्धा साखर, तेल,तूप,दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मसाले, फळे, भाज्या वर्ज असतात.फक्त पाणी, धान्य, आणि डाळी च यात चालतात. असे हे कडक व्रत आहे.
आयमबील ओली चे महत्व
मोठ्यातले मोठे आजार फक्त आयमबील आणि प्रार्थना या दोन्ही मुळे ठीक होतात असा या व्रताचा महिमा आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात सुद्धा या व्रताचा लाभ होतो. भगवान कृष्ण यांच्या यादवीच्या काळात जैन पुण्यातम्यांनी हे व्रत केले होते असे जैन धर्मातील जाणकार सांगतात . आयमबील ओली हे व्रत चक्राकार वृत्ती ने केली जाते. म्हणजे एकाच घरातील आई नन्तर मुलगा नन्तर वडील असे वाटून करतात .
शारीरिक फायदे
आयमबील ओली या व्रतामुळे सात्विक आहार खाण्यात येतो . तसेच मसाले विरहित पदार्थ, आणि तेल तूप दूध साखर इत्यादी नसल्यामुळे ते अगदी च साधे आणि उकडलेले अन्न असते. त्यामुळे ते निसर्गाच्या अगदीच जवळ आहे . त्यामुळे पूर्ण शरीराचे स्वस्थ राखले जाते.