कमल हसन यांचा नवीन Digital प्रयोग, Metaverse मध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय सुपरस्टार.

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते, राजकारणी, निर्माते आणि दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे कमल हसन (Kamal Hasan) आता आणखी एका अनोख्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

आपल्या 60 वर्षांच्या आयुष्याच्या प्रवासात जे अनेक चढ-उतार आले होते त्याबाबत मेटाव्हर्सवर ते माहिती देणार आहेत . कमल हसन यांनी या उपक्रमासाठी Fantico या भारतीय परवानाधारक डिजिटल प्लॅटफॉर्मबरोबर भागीदारी केली आहे.

डिजिटल जगामध्ये (Digital World) पाऊल ठेवत ते Non-fungible token च्या या अनोख्या डिजिटल दुनियेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे मेटाव्हर्सच्या (Metaverse) या अनोख्या जादुई दुनियेत प्रवेश करणारे ते पहिले भारतीय सेलिब्रिटी (First Indian Celebrity) ठरतील

कमल हसन यांनी 7 नोव्हेंबर रोजी त्यांच्या 67 व्या वाढदिवशी ही घोषणा केली असून हा नवीन उपक्रम राबवण्यासाठी आपण अत्यंत उत्साही असून, मेटाव्हर्स (Metaverse) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अनोख्या डिजिटल आणि भौतिक जगाच्या एकत्रीकरणाबद्दल आपण उत्सुक असल्याचं कमल हसन यांनी या वेळी सांगितले.

 

मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे काय ? फेसबुकचे नवीन नाव Meta । What is Metaverse?

 

कमल हसन हे आपले डिजिटल टोकन (NFT) संग्रह दाखल करणार आहेत त्यामुळे ते NFT संग्रह स्थापन करणाऱ्या बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन आणि सनी लिओनी या कलाकारांच्या ग्रुपमध्ये ते सामील होणार.

कमल हसनद्वारे प्रस्थापित केले जाणारे NFT (Non-fungible token) टोकण हे खरेदीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे ज्यांना या NFT टोकणमध्ये गुंतवणूक करायची असेल ते करू शकतील असे कमल हसन ने आपल्या वाढदिवसादिवशी सांगितले.

आपल्या 60 वर्षांच्या आयुष्यातजे अनेक चढ-उतार झाले त्याबाबत मेटाव्हर्सवर कमल हसन माहिती देणार यासाठी कमल हसन यांनी फॅन्टिको (Fantico) या भारतीय परवानाधारक डिजिटल प्लॅटफॉर्मबरोबर भागीदारी केली आहे. हा प्लॅटफॉर्म त्यांचा डिजिटल अवतारदेखील तयार करणार आहे तसेच कमल हसन यांना गेमिंगच्या दुनियेतही विशेष स्थान दिले जाणार असून त्यांच्यासाठी मेटाव्हर्सवर एक गेम दाखल करण्याची योजना फॅन्टिको कंपनीने बनवली आहे.

कमल हसन यांच्या नवीन उपक्रमाचे चाहत्यांनी भरभरून स्वागत केलं आहे, आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कमल हसन यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं अढळ अशे स्थान निर्माण केल आहे.

हेही नक्की वाचा :

 
मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे काय ? फेसबुकचे नवीन नाव Meta । What is Metaverse?

सूर्यास्ताचा आनंद घेताना अभिनेत्री पूजा सावंत | Actress Pooja Sawant Enjoying Sunset

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts