बिग बॉसच्या घरात करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या प्रेमाची व दोघांतील रोमान्स ची जोरदार चर्चा सुरू आहे पण करणच्या मनात तेजस्वी नाही, तर दुसरेच कोणीतरी आहे.बिग बॉसमध्ये येण्याआधीच करण कुंद्रा दुसऱ्याच्या प्रेमात असल्याचे वृत्त आहे.
बिग बॉस 15 फेम करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची फॅन फॉलोविंग वाढली आहे तसेच बिग बॉस च्या घरातील यांचे विडिओ व्हायरल होताना दिसत आहे. आता काही आठवड्यांपासून घरात दोघे एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहे. त्यानंतर त्यांचे सोशल मीडियावर ‘तेजरन’ म्हणून या जोडीवर प्रेमाचा वर्षाव त्यांचे फॅन्स करत आहेत. हॅशटॅग टेजरन म्हणून ट्रेंड करत आहे.
नुकताच करणबाबत एक मोठा खुलासा उघडीस आला आहे तो म्हणजे की करणच्या मनात तेजस्वी नाही, तर दुसरेच कोणीतरी आहे. करण कुंद्रा आधीच त्याची दिल से दिल तक की अभिनेत्री योगिता बिहानीला डेट करत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अशा परिस्थितीत करण तेजस्वीसोबत पुन्हा काय करतोय, असा प्रश्न पडतो. घरात लव्ह अँगल निर्माण करण्यासाठी करण तेजस्वीच्या प्रेमात पडल्याचे नाटक करत आहे का? असा सवाल ही विचारला जात आहे.
करण दुसऱ्या एका को-स्टारला डेट करतोय ?
करण कुंद्रानेच तेजस्वीसोबत घरात प्रेम सुरू केले. शोमधून काढून टाकलेल्या आकासा सिंगने यांची कबुली दिली. नुकत्याच झालेल्या बिग बॉस च्या एपिसोडमध्ये तेजरान एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Paraksh ) ने पहिल्यांदाच करण कुंद्राला (Karan Kundra)आपल्या मनातील गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे नेमकी कोणती वेगडीच खिचडी बिग बॉस च्या घरात बनत आहे का असा अंदाज आहे. याचे कारण म्हणजे करण कुंद्रा आणि त्याची पूर्वीची को-स्टार योगिता बिहानी यांनी दिलेल्या अंदाजानुसार दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि हे दोघेही येत्या काही महिन्यात लग्न पण करणार अशी बातमी आहे . त्यामुळे आता नेमकं काय होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
हेही नक्की बघा :
- कोण आहे ही बिग बॉस १५ मधली तेजस्वी प्रकाश ?
- बीचवर Janhvi Kapoor करतेय लुंगी डान्स
- कोण आहे बिग बॉस १५ मधली मायशा अय्यर ?