कौन आहे प्रवीण तांबे? एका क्रिकेट औलीयाचा  प्रवास…

 

ज्या वयात अनेक क्रिकेट स्टार्स स्वतःला निवरुत्ती देतात. आपली क्रिकेट अकॅडमी काढून तरुण क्रिकेट खेळाडूंना मार्ग दर्शन देतात. काही निवरुत्त खेळाडू आपली दुसरी स्वप्ने पूर्ण करतात किंवा अगदी क्रिकेटचे समालोचक बनुन क्रिकेट रसिकांना खिळवून ठेवतात. पण हे सगळं अगदी उलट आहे या प्रवीण तांबे नावाच्या औलीयाच्या बाबत.

 

प्रवीण तांबे या मराठमोळ्या गोलंदाजाची भूमिका श्रेयस साकारली आहे. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १ एप्रिलला रिलीज झालेला हा सिनेमा ज्या माणसाच्या आयुष्यावर बेतलेला आहे, तो प्रवीण तांबे नेमका आहे तरी कोण?

 

आयपीएलच्या चाहत्यांना हे नाव नक्कीच ठाऊक असेल. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत आपल्या खास लेगस्पिनच्या जोरावर त्याने निराळी छाप सोडली होती. वय वर्ष ४१, म्हणजेच क्रिकेटमधील निवरुत्ती च वय.मात्र वयाच्या चाळीशीत तांबेने पदार्पण केलं आणि उत्तम क्रिकेट खेळून दाखवलं.इतका उत्साह दाखवणाऱ्या तांबेचा क्रिकेटचा प्रवास नेमका कसा आहे, हे मात्र आपल्यापैकी फारसं कुणाला माहित नाही.

 चला मग आज जाणून घेऊया या क्रिकेट औलीयाचा  प्रवास.

मुंबईत १९७१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात प्रवीण यांचा जन्म झाला . आज लेगस्पिनर म्हणून या खेळाडू ने नाव कमावलं असलं, तरी लहान वयात क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या प्रवीणला त्यावेळी मात्र फास्ट बॉलर व्हायचं होतं.नियतीने मात्र वेगळाच या माणसाच्या बाबतीत वाढून ठेवला होता. अजय कदम या कॅप्टन यांच्या सल्ल्याने तांबे लेगस्पिन गोलंदाजी सुरु केली. अनेक वर्ष संघर्ष करावा लागलेल्या प्रवीणच्या आयुष्यात एक आशेचा किरण निर्माण झाला होता, तो २००० साली. रणजी संघाच्या संभाव्य यादीत त्याचं नाव होतं. मुंबईच्या रणजी संघात अंतिम यादीत मात्र त्याला मुसंडी मारता आली नाही. संघर्षाचा प्रवास सुरूच राहिला. मात्र तो थांबला नाही. त्याने त्याची घोडदौड पुढे सुरु ठेवली. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा याच्या जोरावर स्वप्न पूर्ण करायचा चंगच त्याने बांधला होता.

राजस्थान रॉयल्स ने हेरले आणि भारतीय क्रिकेप्रेमींना एक मस्त खेळाडू मिळाला.

त्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द याला अखेर यश आलं. हे घडण्यासाठी २०१३ हे साल मात्र उजाडावं लागलं. राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाने त्याचं टॅलेंट ओळखलं आणि आपल्या संघात त्याला संधी दिली. वयाच्या चाळीशीत आयपीएल पदार्पण करणारा प्रवीण हा भारताचा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला. राहुल द्रविडच्या कर्णधारपदाच्या छत्रछायेत त्याने उत्तम कामगिरी करत अनेकांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं.

 

वयाप्रमाणेच त्याच्या उत्तम क्रिकेटची ही चर्चा होऊ लागली. प्रवीण तांबे हे नाव क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेत अगदी सहजपणे घेतलं जाऊ लागलं. ‘स्वप्नांना वयाचे कसले बंधन’ या म्हणीवर तंतोतंत खरा उतरणारा प्रवीण तांबे अनेकांचा लाडका झाला.

चित्रपटात कोन कोन आहे मग?

इकबाल सिनेमात मूकबधिर क्रिकेटरची उत्तम भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे पुन्हा एकदा अशाच एका कामासाठी क्रिकेटच्या मैदानावर उतरलाय. या वेळी त्याने साकारलेली भूमिका आहे, प्रवीण तांबे यांची. मराठी आणि मुंबईकर असणे ही श्रेयस ची एक मोठी बाजू त्याच्या अभिनयातून अधोरेखीत होते . सोबतीला परमब्रत या कलाकाराची भूमिका ही आपल्या लक्षात राहील अशी आहे. आशीष विद्यार्थी यांनी साकारलेली क्रिकेट कोच ची भूमिका ही खुप उत्तम आहे आणि सोबतीला अंजलि पाटिल यांची श्रेयस च्या पत्नी ची भूमिका अगदी साजेशी आहे. सध्या विकेंड चे वारे वाहत आहेत त्यात हा चित्रपट बघून तुम्हाला नक्की आनंद होईल.चित्रपटातील या वाक्या प्रमाणे  ‘लाइफ हो या मैच, आपको बस एक अच्छा ओवर चाहिए।’ बस हे लक्षात ठेवा, चांगले चित्रपट बघा, मजा करा आणि आपल्या लाडक्या मराठी shout la Instagram आणि Facebook वर फॉलो करा .

 

 

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts