ट्विटर ला पर्याय ? जाणून घ्या स्वदेशी Koo app बद्दल !

ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे ट्विटरवर #kooapp हा ट्रेंड दिसून आला .
टाळेबंदीच्या काळापासून देशात आत्मनिर्भर भारतची वेगाने प्रयत्न सुरू झाले आहे.चिनी कंपन्यांवर बंदी आणल्यावर देसी कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने अॅप्लिकेशन वर काम करीत आहेत.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील काम करीत आहे. ‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार ट्विटरवरचे काही अकाउंट्स बंद करण्यात असून ते ,ती देशाबाहेर सक्रिय असतील पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आम्ही आदर करत असल्याने काही ट्विटर अकाउंट नीळमित केली नाहीत ‘अशी ट्विटरने भूमिका बजावली आहे. या भूमिकेला केंद्र सरकारने आक्षेप घेतला.

माहिती तंत्रज्ञानाचे सचिवांशी चर्चा करण्यापूर्वीच ट्विटरने आपली भूमिका जाही केली आणि हे यॊग्य नसल्याचे सरकारने ‘कू’ या ऍपवर स्पष्ट केले. सध्या Koo App ची जोरदार चर्चा सुरू आहे. Koo App हे एक मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे देशी पर्याय मानले जात आहे.

 


बेंगळुरूस्थित अपरामेया राधाकृष्णन आणि मयंक बिदवक्ता यांनी २०२० साली हे App डेव्हलप केले आहे आणि म्हणूनच कू-अॅपला ट्विटरचे  ‘स्वदेशी’ वर्जनही म्हणतात.याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे Digital India आत्मनिर्भर Bharat Innovate Challenge चे विजेता ठरले आहे.

Image by Google Play Store

सध्या हे ऍप हिंदी,तामिळ,तेलगू आणि कन्नड या भाषेतच उपलब्ध आहे. “भारतात जवळपास 100 कोटी लोकांना इंग्रजी येत नाही केवळ १० टक्के लोक इंग्रजी बोलतात. या लोकांच्या हाती मोबाईल फोन असतोच टरनेटवर बहुतेक गोष्टी या इंग्रजीत आहेत.म्हणूनच भारतीयांचाही आवाज ऐकला जावा, असा कूचा प्रयत्न आहे “. अशी ऍपविषयी माहिती देत असतांना कूच्या वेबसाईटवर लिहिले आहे. प्ले-स्टोअरवर हे ऍप दहा लाखांहून अधिकवेळा डाऊनलोड झालेले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांनी   कू-ऍपवर अकाउंट उघडल्याचे ट्विटरवर सांगितले आणि या मायक्रोब्लॉगिंग साईटवर साइन इन करा असेपण त्यांनी आवाहन केलेत. ही बातमी लिहेपर्यंत  पियूष गोयल यांचे 31 हजारांहून जास्त तर शिवराज सिंह चौहान यांचे 3500 हून जास्त कू ऍपवर फॉलोवर्स झाले होते.यांच्यासोबत कू ऍपवर नीती आयोगनेही अकाउंट उघडले आहे.

२०२० सालापासून सरकारने आयोजित केलेल्या आत्मनिर्भर ऍप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये चिंगारी आणि जोहोसारख्या ऍप बरोबरच कू-ऍप लाही पुरस्कार मिळाला होता.टिकटॉकवर बंदी घातल्यानतंर या ऍप्सची खूप चर्चाही झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गेल्या वर्षी आपल्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमात कू-ऍप ऍपचा विषय काढला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, “एक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ऍप आहे. त्याचं नाव आहे कू. या ऍपमध्ये आपण आपल्या मातृभाषेत टेक्स्ट, व्हिडियो किंवा ऑडियो पाठवू शकतो. इंटरॅक्ट करू शकतो.”

काही जाणकारांचं म्हणणे आहे कि ,”कू-ऍप पुन्हा चर्चेत आहे. ट्वीटरवर दबाव बनवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हे असू शकते “. कू-ऍप जवळजवळ ट्विटर सारखेच आहेत. यात तुम्ही कुणालाही मेसेज लिहून शेयर करू शकता.तुम्ही कुणालाही फॉलो करू शकता. तुम्हालाही कुणीही फॉलो करू शकते. महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे युजर्स आपल्या भाषेत मेसेज लिहून याला शेयर करू शकते. या ऍपवर ४०० शब्दांपर्यंत लिहू शकतात.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts